कॉन्फिडन्स आहे का निऑन रंगाचे कपडे घालण्याचा? फॅशनच्या जगात निऑन रंगांचाच चमकदार ट्रेण्ड..

Published:February 27, 2023 09:37 PM2023-02-27T21:37:04+5:302023-02-27T21:50:00+5:30

Bollywood Divas Rocked The Neon Green Trend : फॅशनच्या जगात सध्या निऑन रंगाचे कपडे आणि ॲक्सेसरीज घालण्याचा ट्रेंड आहे, हा नवा ॲटिट्यूड काय सांगतो?

कॉन्फिडन्स आहे का निऑन रंगाचे कपडे घालण्याचा? फॅशनच्या जगात निऑन रंगांचाच चमकदार ट्रेण्ड..

सध्याच्या फॅशन ट्रेंडमध्ये नियॉन रंगांना खूप महत्व आहे. ऍसिडिक ग्रीन, म्यूटेड नियॉन पिंक, इलेक्ट्रिक ब्लु, फ्लोरोसंट ग्रीन असे वेगवेगळे पण थोडे भडक शेड्स नियॉन ट्रेंडमध्ये मोडले जातात. आपल्यापैकी बऱ्याच तरुणींना आपल्या वॉर्डरॉबमध्ये नियॉन रंगांचे सगळे शेड्स असावेत असे वाटते. निऑन रंग अतिशय तेजस्वी असतो आणि आकर्षणाचा बिंदू बनतो. हा रंग योग्य पद्धतीने योग्य कपड्यांमध्ये नसेल तर तो तुमचा लूक खराब देखील करू शकतो. नियॉन रंगांचा फॅशन ट्रेंड फॉलो करण्याचा मोह आपल्या बॉलिवूड अभिनेत्रींनादेखील आवरला नाही. बॉलिवूड अभिनेत्रींचा हटके नियॉन फॅशन ट्रेंड पाहूयात(Bollywood Divas Rocked The Neon Green Trend).

कॉन्फिडन्स आहे का निऑन रंगाचे कपडे घालण्याचा? फॅशनच्या जगात निऑन रंगांचाच चमकदार ट्रेण्ड..

बॉलिवूडमधील सगळ्याच अभिनेत्रींसोबतच कपूर घराण्यांतील बेबोला देखील या नियॉन रंगांच्या जादूने भुरळ घातली. करिनाने अनेकवेळा वेगवेगळ्या नियॉन रंगांच्या शेड्समधील कपडे परिधान करणे पसंत केले. करिनाने ट्यूब कट स्कर्ट आणि त्यावर ऑफ शोल्डर टॉप परिधान केले आहे. नियॉन रंगांची फॅशन करताना करिनाने स्कर्ट आणि टॉप हे दोन्ही नियॉन रंगांचेच निवडले आहेत. लाईट ब्लु नियॉन रंगाचे टॉप आणि त्यावर जरा भडक दिसणाऱ्या इलेक्ट्रिक लाईम रंगाच्या ट्यूब स्कर्टमध्ये करीना खूप सुंदर दिसत आहे.

कॉन्फिडन्स आहे का निऑन रंगाचे कपडे घालण्याचा? फॅशनच्या जगात निऑन रंगांचाच चमकदार ट्रेण्ड..

२०१९ साली झालेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हल दरम्यान, दीपिका पदुकोण हीने परिधान केलेला गाऊन त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता. त्यावेळी दीपिकाने फॅशन डिझायनर गिआंबट्टिस्ता वल्ली यांनी डिझाईन केलेला नियॉन लाइम शेडेड ट्यूल गाऊन आणि केसांना लाईट पिंक रंगाचा हेअर बँड लावून तिने आपला कान्स फिल्म फेस्टिव्हल दरम्यानचा लूक पूर्ण केला होता.

कॉन्फिडन्स आहे का निऑन रंगाचे कपडे घालण्याचा? फॅशनच्या जगात निऑन रंगांचाच चमकदार ट्रेण्ड..

जान्हवी कपूर हिने देखील आतापर्यंत नियॉन रंगांच्या वेगवेगळ्या शेड्सचे कपडे परिधान करुन फोटो शूट केले आहे. जान्हवीने नियॉन रंगात सगळ्यांत जास्त वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक लाईम रंगाचा मोठा फ्लेयर असणारा वनपीस गाऊन घातला आहे. नियॉन रंगाच्या फ्लोरल ट्यूब डिप कट गाऊनमध्ये जान्हवीचा लूक अतिशय ट्रेंडी दिसत आहे. तिने परिधान केलेला नियॉन कलर्ड हाय स्लिट गाऊन हा सध्याच्या नियॉन ट्रेंडला परफेक्ट मॅच होणारा आहे.

कॉन्फिडन्स आहे का निऑन रंगाचे कपडे घालण्याचा? फॅशनच्या जगात निऑन रंगांचाच चमकदार ट्रेण्ड..

कियारासुद्धा हा नियॉन रंगाचा ट्रेंड फॉलो करण्यात मागे राहिली नाही. नियॉन रंगाचा वन साईडेड बोट नेक शोल्डर को - ऑर्ड सेट परिधान करून कियाराने देखील नियॉन रंगाचा ट्रेंड फॉलो करत असल्याचे सांगितले. केस मोकळे सोडून ड्रेसला मॅच होईल असा मिनिमल मेकअप करुन तिने आपला नियॉन लूक तिच्या चाहत्यांना दाखविला आहे.

कॉन्फिडन्स आहे का निऑन रंगाचे कपडे घालण्याचा? फॅशनच्या जगात निऑन रंगांचाच चमकदार ट्रेण्ड..

मलायका अरोरा हिने फॅशन डिझायनर अमित अग्रवाल यांच्या स्पेशल नियॉन कलेक्शन मधून एक सुंदर ड्रेस निवडला आहे. नियॉन पफी स्लिव्ह्ज गाऊन मधील मलायकाचा लूक चांगलाच फेमस झाला आहे. इलेक्ट्रिक लाईम रंगाच्या या शॉर्ट ड्रेसचे पफी स्लिव्ह्ज खूपच आकर्षक दिसत आहे.

कॉन्फिडन्स आहे का निऑन रंगाचे कपडे घालण्याचा? फॅशनच्या जगात निऑन रंगांचाच चमकदार ट्रेण्ड..

सोनाक्षी सिंन्हा हिने देखील आपल्या नियॉन रंगांची हटके फॅशन दाखवत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोनाक्षीने नियॉन ग्रीन रंगांची फ्लेयर्ड पॅन्ट व त्यावर त्याच रंगाचा व समोरच्या बाजूने नॉट असणारा ब्रालेट टॉप परिधान केला आहे. यावर सोनाक्षीने नियॉन ग्रीन रंगाचेचे लांब श्रग घातले आहे. सोनाक्षीने परिधान केलेले ब्रालेट टॉप, फ्लेयर्ड पॅन्ट, श्रग हे तिन्ही एकाच नियॉन ग्रीन रंगाचे असले तरी ते खूप सुंदर दिसत आहे.

कॉन्फिडन्स आहे का निऑन रंगाचे कपडे घालण्याचा? फॅशनच्या जगात निऑन रंगांचाच चमकदार ट्रेण्ड..

वाणी कपूर नियॉन ग्रीन रंगाच्या स्वीमसूटमध्ये खूपच क्लासी दिसत आहे. वाणी कपूर हिने नियॉन ग्रीन कटाऊट असणारा ट्यूबकट स्वीमसूट परिधान करुन नियॉन रंगांचा एक हटके लूक दाखविला आहे.

कॉन्फिडन्स आहे का निऑन रंगाचे कपडे घालण्याचा? फॅशनच्या जगात निऑन रंगांचाच चमकदार ट्रेण्ड..

आलिया भट हिनेदेखील नियॉन रंगांचे कपडे परिधान करण्याचा फॅशन ट्रेंड फॉलो केला आहे. आलिया हिने सिक्वीन प्रकारातील फ्लोरोसंट पिवळ्या रंगांचा बॉडी फिटिंग ड्रेस परिधान केला आहे.

टॅग्स :फॅशनfashion