मेहेंदी है रचनेवाली! ब्रायडल मेहेंदीचे एक से बढकर एक १३ हटके पॅटर्न आणि डिझाइन्स, एकदा पाहाच...

Published:December 9, 2024 10:00 AM2024-12-09T10:00:40+5:302024-12-09T10:05:01+5:30

Bridal Mehndi Ideas : Bride Mehndi Ideas for Hand : Best Bridal Hand Mehndi Designs : Mehndi Design Patterns : जर तुम्ही नववधू होणार असाल तर खास पाहावेत असे ब्रायडल मेहेंदीचे अनोखे प्रकार...

मेहेंदी है रचनेवाली! ब्रायडल मेहेंदीचे एक से बढकर एक १३ हटके पॅटर्न आणि डिझाइन्स, एकदा पाहाच...

तुळशीच्या लग्नानंतर लग्नाचा खरा सिझन सुरु होतो. लग्नसराईत हातांवर सुरेख मेहेंदी काढणे ओघाने आलेच. लग्नात नववधूच्या हातांवर शोभेल अशी मेहेंदी काढली जाते. खरंतर, मेहेंदीमध्ये अनेक प्रकारचे डिझाइन्स आणि पॅटर्न आपल्याला पहायला मिळतात. पण नेमकी यातल्या कोणत्या डिझाईनची मेहेंदी हातांवर काढायची असा प्रश्न त्या नववधूला पडतो. यासाठीच यंदाच्या लग्नाच्या सिझनमध्ये जर तुमचं देखील 'यंदा कर्तव्य असेल' तर खास या ब्रायडल डिझाईन्स एकदा पाहाच.

मेहेंदी है रचनेवाली! ब्रायडल मेहेंदीचे एक से बढकर एक १३ हटके पॅटर्न आणि डिझाइन्स, एकदा पाहाच...

होणाऱ्या नववधूच्या दोन्ही हातांवर संपूर्ण मेहेंदी काढलेली असेल तर ती अधिकच सुंदर दिसते. या डिझाईनमध्ये तळहातापासून संपूर्ण कोपरापर्यंत मेहंदी लावली जाते, ज्यामुळे नववधूचे हात खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात.

मेहेंदी है रचनेवाली! ब्रायडल मेहेंदीचे एक से बढकर एक १३ हटके पॅटर्न आणि डिझाइन्स, एकदा पाहाच...

या प्रकारच्या पॅटर्नमध्ये बोटांवर नाजूक, सुंदर फुलांचे डिझाईन्स काढले जातात. तसेच मागच्या बाजूला गोल काढून त्यात सुंदर आणि बारीक असे नक्षिकाम केले जाते. ही हातफूल डिझाइन मेहंदी केवळ दिसण्यासाठीच रॉयल नाही तर नववधूच्या ब्रायडल लुकला देखील अतिशय शोभून दिसते.

मेहेंदी है रचनेवाली! ब्रायडल मेहेंदीचे एक से बढकर एक १३ हटके पॅटर्न आणि डिझाइन्स, एकदा पाहाच...

आपण हातापायांवर अशी क्लासिक इंडियन डिझाइनची मेहंदी काढू शकता. जर वधूने अशी भरलेली मेहंदी काढली तर वधूचा लूक खूपच सुंदर दिसतो. तुम्ही देखील या प्रकारची मेहंदी निवडू शकता.

मेहेंदी है रचनेवाली! ब्रायडल मेहेंदीचे एक से बढकर एक १३ हटके पॅटर्न आणि डिझाइन्स, एकदा पाहाच...

या प्रकारची मेहंदीची रचना तळहातांच्या पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूला काढली जाते. त्यामुळे पाहणाऱ्यांची नजर तुमच्यापासून हटणार नाही. अशी मेहंदी वधूच्या घरातील नातेवाईक देखील काढू शकतात.

मेहेंदी है रचनेवाली! ब्रायडल मेहेंदीचे एक से बढकर एक १३ हटके पॅटर्न आणि डिझाइन्स, एकदा पाहाच...

वधू आणि वर डिझाइन ही जवळजवळ प्रत्येक नववधूची पहिली पसंती असते. हा मेहेंदीचा सर्वात पारंपरिक आणि जुना पण तितकाच ट्रेंडी प्रकार आहे असे म्हणता येईल. यात वधूच्या मेहेंदीमध्ये वधू आणि वर काढले जातात. ही पारंपारिक दुल्हा दुल्हन मेहंदी डिझाइन युगानुयुगे ट्रेंडमध्ये आहे आणि पुढेही राहील. ही पारंपारिक मेहंदी तुम्हाला नेहमीच प्रेमात पाडणारी अशी आहे.

मेहेंदी है रचनेवाली! ब्रायडल मेहेंदीचे एक से बढकर एक १३ हटके पॅटर्न आणि डिझाइन्स, एकदा पाहाच...

ही मेहंदी डिझाइन गेल्या २-३ वर्षांपासून खूप ट्रेंडी आहे. हातांवर हे मंडला कला डिझाइन तयार केल्यानंतर, ती खरोखर सुंदर दिसते. या प्रकारची मेहंदी जर नववधूच्या पायावर लावली तर तिच्या पायाचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.

मेहेंदी है रचनेवाली! ब्रायडल मेहेंदीचे एक से बढकर एक १३ हटके पॅटर्न आणि डिझाइन्स, एकदा पाहाच...

साध्या सरळ रेषा काढून बनवलेल्या पॅटर्नमुळे या मेहंदीचा लूक खूप सुंदर दिसतो.

मेहेंदी है रचनेवाली! ब्रायडल मेहेंदीचे एक से बढकर एक १३ हटके पॅटर्न आणि डिझाइन्स, एकदा पाहाच...

या प्रकारचा मेहेंदीचा पॅटर्न पायावर काढला आणि पायांत पैंजण घातल्याने नववधूचा लूक पूर्ण होतो.

मेहेंदी है रचनेवाली! ब्रायडल मेहेंदीचे एक से बढकर एक १३ हटके पॅटर्न आणि डिझाइन्स, एकदा पाहाच...

या प्रकारच्या मेहेंदीमध्ये तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या डिजाईन मेहेंदीत काढू शकता. जरा तुम्हांला तुमच्या मेहेंदीतून तुमच्या प्रेमाची किंवा लग्नाची गोष्ट सांगायची असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या कस्टमाईज मेहेंदी हाता - पायांवर काढू शकता. काहीजण यात होणाऱ्या जोडीदाराचे नाव किंवा त्याचे आद्य अक्षर लिहितात किंवा ज्या दिवशी भेटलो, ओळख झाली ती तारीख लिहितात.

मेहेंदी है रचनेवाली! ब्रायडल मेहेंदीचे एक से बढकर एक १३ हटके पॅटर्न आणि डिझाइन्स, एकदा पाहाच...

बारीक रेषा जोडून तयार झालेला हा मेहंदी पॅटर्न जितका सोपा दिसतो तितका काढणे कठीण आहे.

मेहेंदी है रचनेवाली! ब्रायडल मेहेंदीचे एक से बढकर एक १३ हटके पॅटर्न आणि डिझाइन्स, एकदा पाहाच...

पूर्ण हातापायांवर डिझाइन पॅटर्न, तसेच बरोबर मधोमध पॅटर्न आणि तळहातातील बारीक रेषा, तळहातांना संपूर्ण लूक देणारी, ही रचना तयार केल्यावर खूप छान दिसते.

मेहेंदी है रचनेवाली! ब्रायडल मेहेंदीचे एक से बढकर एक १३ हटके पॅटर्न आणि डिझाइन्स, एकदा पाहाच...

मंडप डिझाइन ही मेहेंदीच्या सर्वात कठीण डिझाइनपैकी एक आहे. यामध्ये मंडपातील सर्व वस्तू मेहंदीच्या डिझाइनच्या रूपात नववधूच्या हातांवर काढल्या जातात. कलश, ढोलकी, फुले, हत्ती, हार अशा प्रकारच्या डिझाईन्स यात असतात. त्यामुळे ही रचना अतिशय आकर्षक दिसते. प्रत्येक वधूला तिच्या हातावर अशी मेहेंदी काढायची असते.

मेहेंदी है रचनेवाली! ब्रायडल मेहेंदीचे एक से बढकर एक १३ हटके पॅटर्न आणि डिझाइन्स, एकदा पाहाच...

पारंपरिक मोर मेहेंदी सध्या ट्रेंडमध्ये आहे. नववधूंना नेहमीच मेहंदीचा हा प्रकार आवडतो. या मेहेंदीच्या डिझाइनमुळे हात पूर्णपणे मेहेंदीने भरला जातो. मोराची रचना संपूर्ण हाताचे सौंदर्य वाढवते.