Join us   

Diwali : सेलिब्रिटींसारखा दिवाळी लूक हवा, ‘अशी’ नेसा अभिनेत्रींसारखी स्टायलिश साडी, बांधा दिसेल कमनीय- दिसाल खास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2024 9:43 AM

1 / 10
दिवाळी (Diwali 2024) म्हटलं की एथनिक विअर आलंच. झगमगाट आणि रोषणाईच्या सणानिमित्त महिलावर्ग आवर्जून साडी नेसतात (Saree Wear). साड्यांमध्येही विविध प्रकार बाजारात आले आहेत. आपण आपल्याला आवडीनुसार साडी खरेदी करतो. साड्या नेसण्याचीही विविध पद्धती सोशल साईट्सवर आहेत(Celebrity-Inspired Saree Looks for Diwali).
2 / 10
पण दिवाळीला कोणत्या पद्धतीची साडी उठून दिसेल? साडी कशी नेसल्याने आपण चारचौघात शोभून दिसू? दिवाळीनिमित्त महागडी साडी नेसायची कशी? असा प्रश्न नक्कीच तुमच्याही मनात आला असेल.
3 / 10
जर आपल्याला दिवाळीनिमित्त साडी लूकमध्ये खास आणि आकर्षक दिसायचं असेल तर, या काही अभिनेत्रींचे हटके साडी लूक फॉलो करून पाहा. दिसाल सुंदर - हटके.
4 / 10
बॉलिवूड दिवा रेखा जवळजवळ प्रत्येक कार्यक्रमात तिची कांजीवराम साडी फ्लाँट करताना दिसते. ती लाल सिंदूर, हेवी ज्वेलरी आणि केसांचा अंबाडा बांधते. ज्यावर ती गजरा अवार्जुन माळते.
5 / 10
लग्नाच्या रिसेप्शनमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माने, सब्यसाचीने डिझाइन केलेली लाल आणि सोनेरी कांजीवराम सिल्क साडी नेसली होती. स्मोकी आईज, केसांचा अंबाडा त्यावर हेवी ज्वेलरी. हा रॉयल लूक आपण यंदाच्या दिवाळीत नक्कीच ट्राय करू शकता.
6 / 10
बॉलीवूडची देसी गर्ल अर्थात, प्रियांका चोप्रा एका रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाची कांजीवरम नेसली होती. यावर तिने लाल लिपस्टिक, मोकळे केस आणि टेम्पल पेंडेंट ज्वेलरी घातली होती.
7 / 10
बॉलीवूडची ड्रीम गर्ल अभिनेत्री हेमा मालिनी फॅशन आयकॉन म्हणूनही ओळखली जाते. ती महत्वाच्या कार्यक्रमात कांजीवरम साडी नेसून हजेरी लावते. तिने गुलाबी रंगाच्या कांजीवरम साडीवर सोन्याचा सुंदर नेकलेस, बांगड्या, आणि कानातले घातले होते. ज्यामुळे क्लासिक लूक वाटत होता.
8 / 10
अभिनेत्री विद्या बालन अनेक फंक्शनमध्ये कांजीवरम साडी परिधान केलेली दिसते. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर हजेरी लावताना, तिने कॉपर शेडची कांजीवरम साडी नेसली होती. या शेडची साडी विद्या बालनवर उठून दिसत होती.
9 / 10
अभिनेत्री दीपिका पदुकोणचाही दिवाळी लूक भन्नाट असतो. आपण दीपिका सोनेरी रंगाची साडी त्यावर चोकर नेकलेस घालू शकता. ज्यामुळे रिच लूक मिळेल.
10 / 10
टॅग्स : दिवाळी 2024फॅशनसोशल व्हायरलबॉलिवूड