1 / 9कधी कधी साडी साधी असेल पण त्यावरचं ब्लाऊज मात्र खूप स्टायलिश असेल तर तुमचा लूक एकदम बदलून जातो आणि साधी साडीही खूप उठून दिसते. असेच काही डिप नेक असणारे सुपर स्टायलिश ब्लाऊज लग्नसराईनिमित्त शिवायचे असतील तर हे काही डिझाईन्स पाहाच..(deep neck blouse designs for super stylish look)2 / 9डिप नेक ब्लाऊजमध्ये सध्या अशा वेगवेगळ्या आकारांचे गळे घेण्याची खूप फॅशन आहे (latest fashion deep neck blouse designs). असं काही वेगळं डिझाईन शिवलं तर ब्लाऊजला खूप हटके लूक येतो.3 / 9ब्लाऊजच्या वरच्या बाजुला लेस किंवा दोरी लावून तिची गाठ बांधण्यापेक्षा हल्ली अशा प्रकारची लेस फिक्स केली जाते. त्यामुळे मग हात मागे करून लेस बांधण्याची झंझटच नाही. कारण तसं करणं खूप अवघड जातं.4 / 9अशा पद्धतीच्या ब्लाऊजचाही सध्या ट्रेण्ड आहे. यामध्ये पुढचा गळा बंद किंवा कमी आणि मागचा गळा डिप ठेवला जातो. कॉटन किंवा लिनन साड्यांवर हे ब्लाऊज जास्त चालतात.5 / 9अशा पद्धतीचा गोलाकार गळा आणि त्याला छानशी लेस असं शिवलं तरी खूप छान वाटतं. 6 / 9गोल गळ्याव्यतिरिक्त वेगळा कोणता आकार आवडत असेल तर हे एक डिझाईन छान आहे. सुडौल शरीर असणाऱ्या तरुण महिलांना अशा गळ्याचे ब्लाऊज शोभून दिसते. 7 / 9अशा पद्धतीच्या गळ्याचं ब्लाऊज सध्या खूप ट्रेण्डिंग आहे. असं काही आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवं.8 / 9लग्नसराईनिमित्त या पद्धतीच्या ब्लाऊजलाही खूप मागणी आहे. रिसेप्शन, पार्टी अशा कार्यक्रमांमध्ये डिझायनर साड्यांवर या प्रकारचे ब्लाऊज घालणं अधिक साजेसं वाटेल. 9 / 9