साडी नेसायची हौस! मग 'या' ८ पॅटर्नचे पेटीकोट हवेच, साडी कोणतीही असो - मिळेल परफेक्ट लूक...
Updated:April 19, 2025 14:37 IST2025-04-19T08:25:32+5:302025-04-19T14:37:35+5:30
Different Saree Shapewear & Petticoat Types & Styles : Which type of petticoat is best while wearing a saree : Saree Petticoats : Saree Petticoat Types : Different types of petticoat for sarees : परकरचे ८ वेगवेगळे प्रकार कोणते ते पाहूयात...

साडी नेसायची म्हटलं की त्यासाठी मॅचिंग परकर घेणं आलंच. साडी व्यवस्थित (Different Saree Shapewear & Petticoat Types & Styles) नेसता यावी तसेच साडी नेसल्यावर ती कॅरी करुन व्यवस्थित चालता यावं यासाठी योग्य परकरची ( Which type of petticoat is best while wearing a saree) निवड करणे देखील तितकंच गरजेच असत.
साडी फॅब्रिकच्या प्रकारांनुसार, परकर देखील वेगवेगळ्या प्रकारचे (Different types of petticoat for sarees) असतात. जर तुम्ही मोठ्या हौसेने साडी नेसत असाल तर या ८ प्रकारचे परकर तुमच्याकडे असलेच पाहिजेत, परकरचे ८ वेगवेगळे प्रकार कोणते ते पाहूयात.
१. कॅन कॅन परकर :-
जर तुम्हाला साडी किंवा लेहेंगा, घागरा घातल्यावर हेव्ही किंवा फ्लेअयर लूक हवा असेल तर कॅन कॅन परकर हा अतिशय फायदेशीर ठरेल. हा परकर घातल्याने तुम्हाला हेव्ही किंवा फ्लेअरी लूक येतो, ज्यामुळे तुम्ही अगदी रॉयल दिसता.
२. सॅटिन परकर :-
साडी नेसल्यावर स्लिम लूक हवा असल्यास तुम्ही सॅटीनच्या कापडाचा परकर घालू शकता. सॅटिनचे कापड अतिशय मऊ आणि पातळ असल्याने तुम्हांला स्लिम लूक येईल. शक्यतो पारदर्शक आणि पातळ कापडाच्या साड्यांमध्ये अशा प्रकारचा सॅटिनचा परकर घालवा.
३. बॉडी शेपर पेटीकोट :-
जर तुम्हाला साडी नेसल्यावर बॉलिवूड अभिनेत्रींसारखा स्लिम आणि कर्वी लूक हवा असेल तर मग तुमच्याकडे बॉडी शेपर पेटीकोट असलाच पाहिजे. हा पेटीकोट आपल्या फिगरच्या आकारानुसार ऍडजेस्ट करता येत असल्याने तो अगदी अंगाला चिकटून बसतो, ज्यामुळे तुम्हाला स्लिम लूक मिळतो. साडी नेसल्यावर तुमच्या कंबरेकडील भाग आणि हीप्सना शेपमध्ये दिसण्यासाठी बॉडी शेपर पेटीकोट हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे.
४. फिश कट स्टाईल पेटीकोट :-
साडी नेसल्यावर तुम्हाला कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूक हवा असेल तर फिश कट स्टाईल पेटीकोट हा उत्तम पर्याय आहे. या पॅटर्नचा पेटीकोट हा हीप्स आणि मांड्यांजवळीत भागात टाईट असतो आणि गुडघ्याखाली थोडा पायघोळ आणि फ्लेअर असतो. यामुळे तुमच्या हीप्स आणि मांड्यांजवळील भाग शेपमध्ये दिसण्यास मदत होते.
५. शिमरी पेटीकोट :-
पार्टी वेअर किंवा शिमरी साड्यांवर असा शिमरी पेटीकोट अगदी परफेक्ट मॅच होऊन जातो. यामुळे तुम्हाला ग्लॅमरस लूक तर मिळतोच शिवाय हे पेटीकोट बॉडी फिटेड असल्याने तुम्ही यात स्लिम देखील दिसता.
६. कणकवली पेटीकोट :-
कणकवली पॅटर्नचे पेटीकोट शक्यतो कांजीवरम आणि पैठणी साड्यांमध्ये वापरले जातात. यामुळे या साड्यांना एक वेगळाच खास लूक येतो.
७. कॉटन ड्रॉस्ट्रिंग पेटीकोट :-
डेली वेअर आणि कम्फर्टेबल लूकसाठी कॉटन ड्रॉस्ट्रिंग पेटीकोट एक उत्तम पर्याय आहे. कॉटन, बनारसी, जॉर्जेट साड्यांवर या पॅटर्नचा पेटीकोट एकदम परफेक्ट सूट होतो.
८. कट असणारा पेटीकोट :-
कट असणाऱ्या पेटीकोटमध्ये पायाच्या जवळ खालच्या बाजूला एक उभा कट असतो. या कटमुळे हा पेटीकोट सहज काढता - घालता येतो. तसेच या कटमुळे पेटीकोट चालताना पायात अडकत देखील नाही.