दंड फार जाड दिसतात? ६ पॅटर्नचे कपडे घाला, हात अजिबात फुगीर -जाडजूड दिसणार नाहीत
Updated:March 18, 2025 18:55 IST2025-03-18T18:45:20+5:302025-03-18T18:55:58+5:30
Do your arms look too thick? Wear 6 patterned clothes, your arms won't look chubby : हात फारच जाड दिसतात, म्हणून काय कपडे घालायचे? असा प्रश्न पडतो का? मग हे पॅटर्न तुमच्यासाठीच आहेत.

महिला स्वत:च्या शरीराबद्दल प्रचंड विचार करतात. प्रत्येकीच्या शरीराची ठेवण वेगळी असते. तरीही अनेकदा स्वत:च्या शरीराबद्दल अति विचार करून निराश होतात.
काही जणींचे दंड फार जाड असतात. त्यामागे अनेक कारणे असू शकतात. पण मग दंड फार जाड दिसतो किंवा वाईट दिसतो म्हणून त्या अनकम्फर्टेबल होतात.
प्रत्येकीच्या शरीराच्या ठेवणीनुसार तिने जर कपडे वापरले तर, दिसायला ते छान दिसतात. आपल्याला समाधान वाटले पाहिजे असे कपडे घालावेत.
जर तुमचेही दंड फार मोठे दिसतात असे तुम्हाला वाटते तर हे पॅटर्न वापरून पहा.
वेस्टर्न ड्रेसेसवरती मस्त असे जॅकेट घालायचे. निळ्या काळ्या रंगाचे असेल तर उत्तमच. हात जाड दिसणार नाही.
साडी नेसल्यावर महिला दंडाबद्दल अति विचार करतात. साडीमध्ये जर ट्रि-फोर्थ हँण्डचा ब्लाऊज घातला तर दंड जाड नाही तर छान दिसतो.
बलून पॅटर्नचे हात असलेला ड्रेस वापरत जा. त्याला जरा घेर असतो त्यामुळे हाताला तो घट्ट बसत नाही.
बटण स्लिव्ह्ज बाजारात मिळतात. शिऊनही घेता येतात. अशा प्रकारच्या स्लिव्हमध्ये हात बारीक वाटतो.
जिन्सचा टॉप सैल हातांचा वापरा. दिसण्यामध्ये लगेच फरक जाणवेल.
दंडाशी सैल आणि मनगटाशी जरा घट्ट असा पॅटर्न दिसायला छान दिसतो. त्यामध्ये दंडाचा आकारही दिसत नाही.