Join us

दंड फार जाड दिसतात? ६ पॅटर्नचे कपडे घाला, हात अजिबात फुगीर -जाडजूड दिसणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2025 18:55 IST

1 / 10
महिला स्वत:च्या शरीराबद्दल प्रचंड विचार करतात. प्रत्येकीच्या शरीराची ठेवण वेगळी असते. तरीही अनेकदा स्वत:च्या शरीराबद्दल अति विचार करून निराश होतात.
2 / 10
काही जणींचे दंड फार जाड असतात. त्यामागे अनेक कारणे असू शकतात. पण मग दंड फार जाड दिसतो किंवा वाईट दिसतो म्हणून त्या अनकम्फर्टेबल होतात.
3 / 10
प्रत्येकीच्या शरीराच्या ठेवणीनुसार तिने जर कपडे वापरले तर, दिसायला ते छान दिसतात. आपल्याला समाधान वाटले पाहिजे असे कपडे घालावेत.
4 / 10
जर तुमचेही दंड फार मोठे दिसतात असे तुम्हाला वाटते तर हे पॅटर्न वापरून पहा.
5 / 10
वेस्टर्न ड्रेसेसवरती मस्त असे जॅकेट घालायचे. निळ्या काळ्या रंगाचे असेल तर उत्तमच. हात जाड दिसणार नाही.
6 / 10
साडी नेसल्यावर महिला दंडाबद्दल अति विचार करतात. साडीमध्ये जर ट्रि-फोर्थ हँण्डचा ब्लाऊज घातला तर दंड जाड नाही तर छान दिसतो.
7 / 10
बलून पॅटर्नचे हात असलेला ड्रेस वापरत जा. त्याला जरा घेर असतो त्यामुळे हाताला तो घट्ट बसत नाही.
8 / 10
बटण स्लिव्ह्ज बाजारात मिळतात. शिऊनही घेता येतात. अशा प्रकारच्या स्लिव्हमध्ये हात बारीक वाटतो.
9 / 10
जिन्सचा टॉप सैल हातांचा वापरा. दिसण्यामध्ये लगेच फरक जाणवेल.
10 / 10
दंडाशी सैल आणि मनगटाशी जरा घट्ट असा पॅटर्न दिसायला छान दिसतो. त्यामध्ये दंडाचा आकारही दिसत नाही.
टॅग्स : फॅशनमहिलाखरेदीसाडी नेसणे