1 / 7कॉलेज, ऑफिस, पार्टी किंवा लग्न समारंभ असो आपल्याला टॉप-टू - बॉटम छान दिसावे असे वाटत असते. अनेकदा आपण साडी, ड्रेस निवडताना फार विचार करतो. त्यावर कोणत्या रंगाची ज्वेलरी असेल, लिपस्टिकची शेड याविषयी ठरवतो पण दुर्लक्ष करतो ते आपल्या पायातील सॅण्डलकडे. (Best Alternatives to High Heels)2 / 7महिलांसाठी विशेषता सॅण्डलची निवड खूप महत्त्वाची असते. हे आपल्या पायांना आरामासोबतच लूक देते. उच्च टाचांच्या चप्पला घातल्याने पाय दुखतात. अनेकदा फूटवेअर निवडताना आपला गोंधळ उडतो. आपल्यासोबतही असेच होत असेल तर ट्रेण्डी ५ पर्याय पाहा. (Stylish Party Shoes Without Heels)3 / 7आपल्याला हाय हिल्स घालायची नसेल तर आपण बेलीज वापरु शकतो. हे अतिशय आरामदायी आणि स्टायलिश असतात. यामध्ये विविध रंग आणि डिझाइन्सचे पर्याय देखील पाहायला मिळतात. 4 / 7थॉन्ग सॅण्डल ही उन्हाळ्यात घालण्यासाठी चांगला पर्याय आहे. यामध्ये रोजच्या वापरासाठी वेगवेगळ्या डिझाइन आणि रंग आहेत. जे आपल्याला स्टायलिश असण्यासोबत चांगला लूक देतात. 5 / 7हिल्सऐवजी आपण स्ट्रॅप सॅण्डल घालू शकतो. हे आपल्याला स्टायलिश लूक देईल. पारंपरिक किंवा वन पीस ड्रेसवर हे उठून दिसेल. 6 / 7ज्या मुली हिल्स घालणे टाळतात त्यांच्या कलेक्शनमध्ये स्लाईड सॅण्डल नक्कीच असायला हवे. हे आपल्याला वेगवेगळ्या डिझाइन आणि रंगांमध्ये मिळू शकतात. 7 / 7स्नीकर्स हे कॅज्युल वेअरवर छान दिसते. हे आपण पार्टीत देखील घालू शकतो. अतिशय आरामदायी असल्यामुळे आपल्या लूकमध्ये आणखी भर घालते.