Join us

प्रत्येकीकडे हव्याच या ५ साड्या, तुमच्या ड्रेसिंग स्टाईलचं कौतुक होऊन चारचौघींत कायम उठून दिसाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2024 09:10 IST

1 / 7
एरवी जीन्स, सलवार- कुर्ता, वेस्टर्न कपडे असं बऱ्याचजणी घालत असल्या तरी सणावाराला, लग्नकार्यात मात्र आवर्जून साड्याच नेसल्या जातात. म्हणूनच खूप नाही पण मोजक्या ५ प्रकारच्या साड्या तरी तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच पाहिजेत.
2 / 7
साड्यांच्या या कलेक्शनमुळे तुम्ही चारचौघींत नक्की उठून दिसाल. शिवाय सगळेच तुमच्या ड्रेसिंग स्टाईलचं कौतूक करत तुमच्याकडून टिप्स घेतील.
3 / 7
आता पहिली साडी आहे आपल्या मराठीपणाची ओळख सांगणारी पैठणी. सुंदर रंगाची एखादी देखणी पैठणी तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवी.
4 / 7
पार्टी, रिसेप्शन अशा ठिकाणी नेसण्यासाठी शिफॉन प्रकारातली साडी नेसा. या साडीवर एकदम स्टायलिश, नव्या पॅटर्नचं ब्लाऊज शिवा.
5 / 7
काॅटन, इरकल, कॉटन सिल्क या प्रकारातली साडीही तुमच्याकडे असायला पाहिजे. ऑफिस पार्टी किंवा ऑफिसमध्ये कधी साडी नेसून जाण्याची वेळ आली तर या साड्या उठून दिसतात. हल्ली कॉटन साड्यांवर ऑक्सिडाईज दागिने घालण्याचीही खूप फॅशन आहे.
6 / 7
ऑर्गेंझा प्रकारातल्या साड्या सध्या खूप ट्रेण्डिंग आहेत. त्यामुळे बदलत्या फॅशनप्रमाणे राहायचं असेल तर एखादी ऑर्गेंझा साडी घेऊन ठेवाच.
7 / 7
बऱ्याचदा छोटेखानी वाढदिवस, गेटटुगेदर, गॅदरींग असे लहानमोठे कार्यक्रम असतात. अशा छोटेखानी कार्यक्रमांमध्ये नेसायला डिझायनर प्रकारातली जॉर्जेट साडी छान दिसते.
टॅग्स : फॅशनब्यूटी टिप्ससाडी नेसणेस्टायलिंग टिप्स