दिवाळीसाठी कपडे खरेदी करताय? ‘या’ ७ रंगांचे कपडे घ्या, दिवाळीत तुमच्यावरुन नजर हटणार नाही...

Published:October 9, 2024 07:21 PM2024-10-09T19:21:54+5:302024-10-09T19:32:23+5:30

Fashion 7 Different Color Combinations For Ethnic Wear Like Lenhga Kurta Sets For Upcoming Festivals Wedding Season : दसरा-दिवाळीसाठी कपड्यांची खरेदी करताना, हे ७ कलर कॉम्‍ब‍िनेशन करा ट्राय, मिळेल परफेक्ट फेस्टिव्ह लूक-दिसाल सुंदर...

दिवाळीसाठी कपडे खरेदी करताय? ‘या’ ७ रंगांचे कपडे घ्या, दिवाळीत तुमच्यावरुन नजर हटणार नाही...

नवरात्रीचा सण आता संपत आला. सध्या सगळ्यांनाच वेध लागले आहेत ते दसरा - दिवाळीचे. दसरा - दिवाळी निमित्त सगळ्या बाजारपेठा अगदी फुलून गेल्या आहेत. काहींनी तर दसरा दिवाळीनिमित्त घातल्या जाणाऱ्या कपड्यांच्या खरेदीला सुरुवात देखील केली आहे. आपण सगळेच दसरा - दिवाळी निमित्त नवनवीन कपड्यांची खरेदी करतो. सण-उत्सवादरम्यान घातला जाणारा पोशाख इतरांपेक्षा वेगळा असावा असे प्रत्येकाला वाटते. सणावाराला आपण शक्यतो लेहेंगा, साडी, पंजाबी ड्रेस, शरारा-गरारा असे ट्रॅडिशनल पॅटर्नचेच कपडे घेणे पसंत करतो. कपड्यांच्या पॅटर्न इतकेच त्याचा रंग देखील तितकाच महत्वाचा असतो. तुमच्या ड्रेसचे कलर कॉम्बिनेशनच जर तुम्हाला शोभून दिसत नसेल तर संपूर्ण लुकच खराब होतो. अशा परिस्थितीत, तुमचा लुक सुंदर दिसण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमच्या ड्रेसचे कलर कॉम्बिनेशन. दसरा - दिवाळीनिमित्त खरेदी करताना कोणत्या प्रकारचे कलर कॉम्बिनेशन निवडावेत, ते पाहूयात(Fashion 7 Different Color Combinations For Ethnic Wear Like Lenhga Kurta Sets For Upcoming Festivals Wedding Season).

दिवाळीसाठी कपडे खरेदी करताय? ‘या’ ७ रंगांचे कपडे घ्या, दिवाळीत तुमच्यावरुन नजर हटणार नाही...

नेव्ही ब्लू आणि मस्टर्ड यल्लो या दोन रंगाचे कलर कॉम्बिनेशन चारचौघात अगदी उठून दिसते. तुम्ही सलवार - सूटमध्ये मॅचिंग कॉम्बिनेशन शोधत असाल किंवा लेहेंगा आणि साडीमध्ये जर ब्लाऊज कॉन्ट्रास्ट रंगाचे निवडायचे असेल तर, नेव्ही ब्लू आणि मस्टर्ड यलो रंग एकमेकांशी चांगले जुळतात. या दोन रंगांचे मिश्रण करून तुम्ही तुमच्या पोशाख एकदम रॉयल स्टाइल करु शकता.

दिवाळीसाठी कपडे खरेदी करताय? ‘या’ ७ रंगांचे कपडे घ्या, दिवाळीत तुमच्यावरुन नजर हटणार नाही...

फक्त वेगवेगळ्या प्रकारचे रंगचं नाही तर त्या रंगाच्या अनेक शेड्स देखील तुमच्या आऊटफिटला एकदम हटके लूक देऊ शकतात. शॉकिंग प‍िंक आणि पेल टेंजर‍िन हे दोन रंग एकमेकांसोबत अधिकच खुलून दिसतात. शक्यतो जर तुम्ही लेहेंगा किंवा पंजाबी ड्रेस घेणार असाल तर या दोन रंगाचे कॉम्‍ब‍िनेशन फारच सुंदर दिसेल.

दिवाळीसाठी कपडे खरेदी करताय? ‘या’ ७ रंगांचे कपडे घ्या, दिवाळीत तुमच्यावरुन नजर हटणार नाही...

आइस ब्‍लू हा रंग सध्या फारच ट्रेंडिंगमध्ये आहे. आइस ब्‍लू रंगाचा पोशाख तुम्ही दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळच्या फंक्शन्समध्ये घालू शकता. आइस ब्‍लू सोबत मस्‍टर्ड रंग आणखीनच छान दिसतो.

दिवाळीसाठी कपडे खरेदी करताय? ‘या’ ७ रंगांचे कपडे घ्या, दिवाळीत तुमच्यावरुन नजर हटणार नाही...

जर तुम्हाला तुमच्या आउटफिटमध्ये सगळ्यात वेगळा आणि गडद लुक हवा असेल तर हे नेव्ही ब्लू आणि फॉरेस्ट ग्रीन रंगाचे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही साडी आणि ब्लाऊज खरेदी करताना या रंगाच्या कॉम्बोची नक्कीच निवड करु शकता.

दिवाळीसाठी कपडे खरेदी करताय? ‘या’ ७ रंगांचे कपडे घ्या, दिवाळीत तुमच्यावरुन नजर हटणार नाही...

ऑबर्ज‍िन हा पर्पल रंगाचाच एक हटके शेड आहे. हा जांभळ्या रंगाचा ट्रेंड सध्या फार सुरु आहे. पेल टेंजर‍िन जसा शॉकिंग प‍िंकसोबत उठून दिसतो त्याचप्रकारे टेंजर‍िन हा ऑबर्ज‍िन सोबत धिक खुलून येतो. या रंगाचा अनारकली घेरदार ड्रेस सूट किंवा लेहेंगा खूपच छान दिसेल.

दिवाळीसाठी कपडे खरेदी करताय? ‘या’ ७ रंगांचे कपडे घ्या, दिवाळीत तुमच्यावरुन नजर हटणार नाही...

जर तुम्हाला अगदी शाही किंवा रॉयल लूक हवा असेल तर आपण हे दोन रंग नक्की ट्राय करू शकता. डीप टील आणि रेड हे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला कोणत्याही पार्टीसाठी एकदम हटके आणि रॉयल लूक देण्यास मदत करतील. जर तुमचा स्किन टोन हा थोडासा डार्क किंवा गव्हाळ असला तरी हे दोन्ही रंग तुमच्यावर शोभून दिसतील.

दिवाळीसाठी कपडे खरेदी करताय? ‘या’ ७ रंगांचे कपडे घ्या, दिवाळीत तुमच्यावरुन नजर हटणार नाही...

कुठलाही सणवार किंवा लग्नसोहळा, खास कार्यक्रम, समारंभ असो लाल रंग हा अधिकच उठून दिसतो. लाल रंग हा आपण शक्यतो सणवार, लग्नसोहळा,समारंभात घालतोच. लाल रंग हा नेहमीचाच असला तरीही या रंगासोबत एक्‍वा रंग अगदी परफेक्ट मॅच होतो. त्यामुळे आपण एक्‍वा आणि लाल या दोन रंगांचे देखील कलर कॉम्बिनेशन नक्की ट्राय करु शकता.