Join us

जीन्स घातल्यावर चप्पल घालावी की बूट-सँण्डल? शोभून काय दिसेल, लक्षात ठेवा ही आयडिया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2025 20:15 IST

1 / 8
जीन्स म्हणजे प्रत्येकीच्याच कपाटातला सगळ्यात आवडता (Footwear According To Jeans) आऊटफिट मानला जातो. निळी आणि काळी अशा एवढ्या बेसिक जीन्स असल्या तरी पुरेसे आहे. कित्येक टॉप्सवर, कुर्तींवर या जीन्स आलटून पालटून घातल्या तरी चालून जातात.
2 / 8
पण जीन्स घातल्यावर त्यावर नेमकी कोणत्या प्रकारची चप्पल पायात (How To Pair Footwear With Jeans) घालावी ते समजत नाही. काहीवेळा जीन्स घातल्यावर त्यावर आपण आपल्याला हवा तो चपलेचा प्रकार घालतो, परंतु काहीवेळा ते जीन्सला शोभून दिसत नाही. यामुळे जीन्स आणि आपला संपूर्ण लूकच खराब होऊन जातो.
3 / 8
त्यामुळे वेगवेगळ्या जीन्सच्या पॅटर्ननुसार, नेमकी कोणत्या जीन्सवर (Women footwear according to jeans) कोणती चप्पल, बूट, सॅंडल शोभून दिसेल ते बघाच...जरा तुमच्या जीन्सच्या पॅटर्ननुसार तुम्ही चपलेची योग्य निवड केली तर तुमचा लूक उठून दिसेल..
4 / 8
जर तुम्ही स्ट्रेट लेग पॅटर्नची जिन्नस घातली असेल तर त्यावर वेगवेगळ्या रंगाचे लोफर्स, ब्लॉक हिल्स किंवा चंकी स्नीकर्स चांगले घातलेले चांगले दिसतील.
5 / 8
बोट कट किंवा फ्लेअर्ड जीन्स असे दोन्ही जीन्स पॅटर्न जर तुम्ही अगदी आवडीने घालत असाल तर त्यावर अगदी परफेक्ट दिसणारी चप्पल किंवा सॅंडल पायांत हवीच. यासाठी आपण पॉईंटेड टो हिल्स, वेजेस, काऊबॉय बूट या तीन प्रकारांतील चपला पायांत घालू शकता.
6 / 8
जर तुम्ही वाइड लेग किंवा बॅगी जीन्स घालणार असाल तर त्यावर चंकी स्नीकर्स, प्लॅटफॉर्म सॅण्डल्स, पॉईंटेड टो हिल्स आपण घालू शकता. ज्यामुळे तुमची जीन्स अजूनच छान दिसेल.
7 / 8
बॉयफ्रेंड किंवा मॉम फिट या पॅटर्न मधील जीन्सवर स्नीकर्स, स्ट्रॅपी हिल्स, अँकल बूट्स या तीन प्रकारातील चप्पला तुम्ही पायांत घालू शकता.
8 / 8
पायाला अगदी चिकटून बसणाऱ्या अशा घट्ट स्किनी जीन्सवर स्नीकर्स, अँकल बूट्स, पाम्स अगदी उठून दिसतील.
टॅग्स : फॅशनस्टायलिंग टिप्स