आलिया भट ते परिणिती चोप्रा, लग्नात पेस्टल शेड्सचेच घागरे घालणाऱ्या ६ अभिनेत्री! फिके रंग त्यांनी का निवडले?
Updated:September 30, 2023 16:04 IST2023-09-30T15:57:40+5:302023-09-30T16:04:17+5:30

अगदी आता मागच्या दोन- तीन वर्षांपर्यंत बॉलीवूडमध्ये असा ट्रेण्ड होता की लग्नात नवरीचे कपडे कसे लाल, हिरवे अशा भडक रंगाचे हवे... मग ती नवरी इतरांपेक्षा वेगळी वाटायची. अगदी दिपिका- अनुष्का यांच्या लग्नातही हाच ट्रेण्ड होता.
पण आता मात्र हा ट्रेण्ड पुर्णपणे बदलला असून नवरीही फिक्या रंगाचे कपडे घालण्यास प्राधान्य देत आहे. अभिनेत्री परिणिती चोप्रा हिने तिच्या लग्नात घातलेल्या लेहेंग्याचा रंग पाहून हा ट्रेण्ड पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. परिणितीने तिच्या लग्नात घातलेल्या लेहेंग्याचा रंग Ecru म्हणजे पिवळट ग्रे होता.
आलिया भट आणि रणबीर कपूर यांचं लग्न बॉलीवूडमधलं एक गाजलेलं लग्न. यात आलिया आणि रणबीर या दोघांनीही पेस्टल शेड्सचे कपडे घालण्यास प्राधान्य दिलं होतं.
अभिनेत्री कियारा आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा नुकतेच विवाह बंधनात अडकले. यावेळी कियाराने घातलेला लेहेंगाही बेबी पिंक रंगाच्या अगदी फिकट शेडमधला होता.
अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी अथाया शेट्टी हिचा लेहेंगाही पीच कलरमधल्या एकदम लाईट शेडचा होता.
अभिनेत्री नेहा धुपिया हिनेही तिच्या लग्नात बेबी पिंक कलरचा भरपूर हेवी वर्क असलेला लेहेंगा घातला होता.
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि स्टार क्रिकेटर यांनीही त्यांच्या लग्नात भडक कपडे घालणं पुर्णपणे टाळलं होतं. फिकट गुलाबी रंगाच्या घागऱ्यात अनुष्का सुंदर दिसत होती.