Join us   

कमालच झाली! चक्क ४ अभिनेत्रींनी खरेदी केला एकसारखा ड्रेस- बघा कोण त्या चौघी, कसा आहे तो ड्रेस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2024 5:47 PM

1 / 5
एरवी अभिनेत्री एकमेकींसारखे कपडे घालणं तर काय पण एकमेकींसारखी स्टाईल करणंही टाळतात. पण एक असा खास ड्रेस आहे जो मात्र तब्बल ४ बॉलीवूड सेलिब्रिटींनी घेतला. तो ड्रेस नेमका कोणता आणि तो काेणी कोणी घातला ते पाहा..
2 / 5
हा पांढऱ्या रंगाचा आणि लाल फुलं असणारा सलवार कुर्ता बॉलीवूड अभिनेत्रींना अतिशय आवडला असल्याचं दिसून येतं. आता नुकताच हा कुर्ता अनन्या पांडेने (Ananya Panday) घातला होता. मतदानासाठी जाताना तिने या ड्रेसची निवड केली होती. पण त्याआधी असाच ड्रेस इतर तिघींच्या अंगावरही दिसून आला.
3 / 5
त्यापैकी एक आहे आलिया भट (Alia Bhatt). आलियाने काही महिन्यांपुर्वीच असा ड्रेस घातल होता. एका खांद्यावरून ओढणी घेतलेली आलिया त्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. हा कुर्ता चंदेरी कपड्यातला असून तो अतिशय आरामदायी असावा असं या सगळ्याच अभिनेत्रींकडे पाहून वाटतं.
4 / 5
The Loom या ब्रॅण्डचा हा ड्रेस असून त्याची किंमत ५,३९९ रुपये आहे. काही दिवसांपुर्वी मलायका अरोराच्या (Malaika Arora) अंगावरही असाच ड्रेस दिसून आला. मलायकाने मागच्या बाजुने गळ्यात ओढणी अडकवली होती आणि ती दोन्ही खांद्यांवरून पुढे सोडली होती. मलायकाही त्या ड्रेसमध्ये अतिशय आकर्षक दिसत होतील.
5 / 5
जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) नेहमीच भारतीय पेहरावामध्ये आकर्षक दिसते. आलिया, अनन्या आणि मलायकाला आवडलेला हा ड्रेस जान्हवीलासुद्धा खूप आवडला. तिचे हे फोटो काही दिवसांपुर्वी व्हायरल झाले होते. या चौघींमध्ये जान्हवीनेच तो ड्रेस अतिशय आकर्षक पद्धतीने कॅरी केला असून त्याला साजेसा मेकअप आणि कानातले घातल्याने ती जास्त आकर्षक वाटते आहे, असं नेटीझन्स आणि जान्हवीचे चाहते म्हणत आहेत.
टॅग्स : फॅशनआलिया भटजान्हवी कपूरमलायका अरोराअनन्या पांडे