1 / 8हिवाळ्यातल्या लग्नसराईमध्ये ब्लाऊज डिझाईन्सचा, ब्लाऊज पॅटर्नचा नवा ट्रेण्ड येत असतो. त्यानुसार यादरम्यान खास पुर्ण बाह्यांचे ब्लाऊज शिवले जातात. साडीवर किंवा लेहेंग्यावर घालण्यासाठी लेटेस्ट ट्रेण्डी ब्लाऊज पॅटर्नच्या शोधात असाल तर हे काही पर्याय एकदा तपासून पाहा...2 / 8बनारसी, कांजीवरम किंवा कोणत्याही काठ पदराच्या साडीवर घालायला असं प्लेन ब्लाऊज घेऊ शकता. कॉन्ट्रास्ट रंगाचं ब्लाऊज घेतलं तरी चालेल.3 / 8डिझायनर साडी असेल तर त्यावर असं डिझायनर पॅटर्नचं ब्लाऊज शिवा. हल्ली ब्लाऊजच्या बाह्यांना वेगळा कपडा आणि इतर बॉडीसाठी वेगळा कपडा, असाही ट्रेण्ड आहे.4 / 8कॉटनची किंवा सिल्क कॉटनची प्लेन साडी असेल तर तिच्यावर अशा पद्धतीचं पुर्ण बाह्यांचं कलमकारी ब्लाऊजही छान दिसेल.5 / 8फुल बाह्यांच्या ब्लाऊजसाठी दिपिकाचा हा ट्रेण्डी लूकही पाहून घ्या. खास थंडीसाठी होजियरीच्या जाड कपड्यातले अशा पद्धतीचे ब्लाऊजही बाजारात मिळतात.6 / 8साडी खूप हेवी वर्क नसेल किंवा शिफॉनसारख्या सुळसुळीत प्रकारची असेल तर तिच्यावर असं हेवी वर्कचं ब्लाऊज छान दिसेल.7 / 8लेहेंग्यावर ब्लाऊज शिवायचं असेल तर हिना खानचा हा लूक बघा. तिचा समोरचा गळा अतिशय डिप आहे. पण तुम्ही तो तुमच्या आवडीनुसार शिवू शकता8 / 8कॉटनची साडी असेल तर अशा पद्धतीचं समोरच्या बाजुने पंचकोनी आणि मागच्या बाजुने डिप नेक असलेलं ब्लाऊज घेऊ शकता.