गुढीपाडव्याला पैठणी घ्यायची म्हणता? बघा सध्या ट्रेण्डिंग असणारे पैठणीमधले ५ रंग- दिसाल आकर्षक
Updated:March 26, 2025 15:28 IST2025-03-26T15:23:40+5:302025-03-26T15:28:56+5:30

गुढीपाडव्याच्या निमित्ताने किंवा मग लवकरच येणाऱ्या लग्नसराईच्या निमित्ताने पैठणी खरेदी करण्याचा विचार असेल तर सध्या पैठणीमध्ये कोणते रंग ट्रेंडींग आहेत ते एकदा पाहून घ्या.. म्हणजे मग तुमचीही पैठणीची खरेदी अगदी झकास होऊन जाईल...
पैठणीचे सगळेच रंग खरंतर खूप आकर्षक वाटतात. पण त्यातही सध्या अशा पद्धतीच्या मरून, रेड रंगाची मिश्र छटा असणाऱ्या पैठणीचा ट्रेण्ड आहे.
अशा पद्धतीचा फिरता रंग असणारी किंवा ड्यूएल टोन प्रकारातली 'रस्ट' पैठणीही सध्या ट्रेण्डिंग आहे.
पोपटी, गर्द हिरवा असे पैठणीमध्ये हिरव्या रंगाचेही अनेक प्रकार मिळतात. पण त्यातही सध्या असा बॉटल ग्रीन किंवा काळपट हिरवा रंग जास्त चालतो आहे.
पिकॉक ब्लू रंगाच्या पैठणीलाही सध्या खूप मागणी आहे. लग्नसराईमध्ये तर हा रंग विशेष घेतला जातो.
अशा पद्धतीच्या गुलाबी रंगाच्या पैठणीला पैठणी रंग म्हणतात. पैठणीचा हा मूळ रंग असल्याचं मानलं जातं त्यामुळे या पैठणी रंगाच्या पैठणीला नेहमीच मागणी असते.