गुढीपाडवा स्पेशल: पारंपरिक मराठी दागिन्यांची श्रीमंती, बघा महाराष्ट्राची ओळख सांगणारे १२ मराठमोळे दागिने By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2024 1:11 PM 1 / 13गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात (Gudi Padwa 2024). यानिमित्ताने जर मराठी लूक करणार असाल किंवा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर (Gudi Padwa 2024 Marathi) दागिन्यांची खरेदी करायची असेल तर हे काही पारंपरिक मराठी दागिने पाहून घ्या...2 / 13नथ हा महाराष्ट्राची ओळख सांगणारा दागिना. या नथीशिवाय पारंपरिक मराठी वेशभुषा नाहीच. 3 / 13कानातल्या अशा पद्धतीच्या बुगड्याही केवळ महाराष्ट्रातच दिसतात.4 / 13या मोत्यांच्या कुड्या ही देखील महाराष्ट्राची ओळख.5 / 13महाराष्ट्रात पुर्वी महिला केसांचे खोपे घालायच्या. त्या खोप्यांना ही पिन लावली जायची. खोपा पिन म्हणून ती ओळखली जाते.6 / 13हा आहे गळ्यात घालायचा तन्मणी. हा देखील एक पारंपरिक मराठी दागिना आहे.7 / 13तन्मणी गळ्यात घातला तर त्याच्या जोडीला गळ्यालगत हा चिंचपेटी म्हणून ओळखला जाणारा दागिना घातला जातो.8 / 13बोरमाळ किंवा मोहन माळ हा एक जुना मराठी दागिना आहे.9 / 13पुर्वी बऱ्याच महिलांच्या गळ्यात अशा पद्धतीची एकदाणी दिसायची. हल्ली दोन- तीन पदरांमध्येही एकदाणी मिळते.10 / 13याला म्हणतात पोहेहार. काही ठिकाणी हा श्रीमंत हार म्हणूनही ओळखला जातो.11 / 13बकुळीच्या सुंदर फुलांचं डिझाईन असणारा हा बकुळहारही महाराष्ट्राची ओळख आहे. 12 / 13गळ्यालगत असणारा हा दागिना म्हणजे ठुशी.13 / 13ठुशीऐवजी काही जणी अशी वजरटिक घालतात. यालाच कोल्हापुरी साज म्हणूनही ओळखले जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications