1 / 10भारताच्या परंपरेला साजेसा पेहराव म्हणजे साडी. मग ती नऊवारी साडी असेल किंवा सहावारी. गुजराती साडी असेल किंवा बंगाली. साडी नेसल्यावर महिलांचे रुप खुलूनच दिसते. 2 / 10प्रत्येक राज्यामध्ये साडी नेसायची पद्धत जशी वेगळी तशीच शृंगाराची पद्धतही. महाराष्ट्रामध्ये सणासुदीला जेव्हा महिला साडी नेसतात तेव्हा त्याबरोबर हाता-पायात तसेच गळ्यात काही दागिने घालतात. 3 / 10साडी तशी कोणत्याही शृंगाराशिवायही छान दिसतेच. मात्र गुढीपाडव्यासारख्या सणांना नऊवारी साडी नेसल्यावर त्याबरोबर दागिन्यांचा साज हवाच.4 / 10नऊवारी साडी नेसल्यावर मोकळं नाक छान वाटत नाही. नाकामध्ये मस्त पैकी नथ हवीच. मग ती तुमच्या चेहऱ्याला जशी शोभेल तशी वापरा. लहान-मोठी, खड्याची-मोत्याची अनेक प्रकार असतात.5 / 10नऊवारीवर आपण मोठे छान हार घालतोच. मात्र नाजूक अशी ठुशी फारच सुंदर दिसते. कोणत्याही रंगाची साडी असो ठुशी छानच दिसते. गळा अगदी सुडौल दिसतो.6 / 10नऊवारी नेसल्यावर केसांच्या विविध हेअरस्टाईल चांगल्या वाटतात. मात्र आंबाड्याची बातच काही और आहे. लहान केस असतील तर, आंबाडा विकतही मिळतो. मानेपर्यंत आलेला घट्ट असा आंबाडा नऊवारीवर शोभून दिसतो. 7 / 10नऊवारीवर झुमके साधे कानातले इतरही छान वाटतात. मात्र कुड्या घातल्यावर त्या जास्त छान दिसतात. पूर्वीच्या महिला कुड्यांचा वापर भरपूर करायच्या.8 / 10कान अजून सुशोभित दिसण्यासाठी गरजेची असते ती म्हणजे बुगडी. आजकाल तर अनेक विविध पद्धतीच्या बुगड्या बाजारात मिळतात. 9 / 10नऊवारीवर मोकळे हात अजिबात चांगले वाटत नाहीत. हातामध्ये बांगडी तर हवीच. पण बांगडीपेक्षाही तोडे जास्त उठून दिसतात. बांगड्या आणि तोड्यांचे कॉम्बिनेशन करून हातात घालायचे. 10 / 10आपल्याकडे कुंकू ठसठशीत असावं असे म्हटले जाते. मात्र नऊवारी नेसल्यावर कपाळाला चंद्रकोरच हवी. लहान असो वा मोठी. लाल असो वा रंगीत. चंद्रकोरेची शोभा वेगळीच असते.