Heels hurt, toes blisters from wearing high heels? 6 tips, walk well even wearing high heels
हाय हिल्स घालून टाचा दुखतात, बोटांना फोड येतात? ६ टिप्स, हाय हिल्स घालूनही चाला भरभरPublished:December 7, 2022 02:06 PM2022-12-07T14:06:56+5:302022-12-07T14:12:41+5:30Join usJoin usNext High Heels हाय हिल्स कोणते घालावे, कोणते निवडावे यासाठी काही सोप्या गोष्टी. आजकल महिलांमध्ये हिल्स घालण्याचा ट्रेण्ड मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. लग्न समारंभ, पार्टी, ऑफिस, डिनर अथवा शॉपिंग प्रत्येक मोठ्या समारंभाला किंवा दैनंदिन जीवनशैलीत हिल्स या चप्पलांना महिला सहजरीत्या कॅरी करतात. मात्र, हेच हिल्स अधिक वेळ घालून चालले तर पायांना सूज किंवा दुखण्यास सुरुवात होते. अशावेळी काय करावे? बहुतांश वेळा आपण टाईट हिल्स घालतो. ज्याने आपल्या पायांवर जळजळ अथवा पायांवर फोड येतात. ते फोड फुटल्यानंतर खूप वेदना होतात. ही समस्या टाळण्यासाठी आपण ब्लो ड्रायरचा वापर करू शकता. आपण त्या जागेवर ब्लो ड्राय केले तर बरे वाटते. सतत हिल्स घातल्याने पायांना सूज, जळजळ किंवा फोड उठत असेल तर, हिल्स घालण्यापूर्वी मॉइस्चराइज़ लावा. मॉइश्चरायछर लावल्याने पायांना आराम मिळेल आणि ते कोमल राहतील. हिल्समध्ये देखील विविध प्रकार आहेत. बहुतांश महिला या पेंसिल हील्स या स्टेलेटोज हिल्स घालण्यास प्राधान्य देतात. पण त्यापेक्षा ब्लॉक हील्स घालणे उत्तम. या हिल्स आपल्या पायांना चांगला आधार देतात, त्यामुळे पायांवर कमी दाब पडतो आणि वेदना कमी होतात. हिल्सची निवड करताना आपल्या पायांच्या हिशोबाने निवड करा. जे आपल्या पायांना चांगले कव्हरेज देतील. टाचांचे कव्हरेज जितके चांगले असेल तितका चांगला आधार मिळेल आणि पाय दुखणे कमी होईल. हाय हिल्स घातल्यानंतर जर आपल्या पायांना दुखापत होत असेल. तर, पायांना बर्फाने मसाज करा. यासह पायांची चांगली मालिश करा. आपल्या पायांना भरपूर आराम मिळेल. हिल्स घालून जर आपल्या पायांना आणि बोटांना इजा होत असेल तर, तिसऱ्या आणि चौथ्या बोटांना टेपने चिकटवा. याने नसांवर दबाव आणि पडत, फोड येत नाही आणि दुखापतही होत नाही.टॅग्स :लाइफस्टाइलफॅशनLifestylefashion