चेहऱ्याचा आकार कसा आहे, गोल-चौकोनी की निमुळता? त्याप्रमाणे ‘असे’ शिवा ब्लाऊज, परफेक्ट लूकची युक्ती

Updated:February 18, 2025 18:58 IST2025-02-18T18:49:05+5:302025-02-18T18:58:02+5:30

Blouse Stitching Tips Based on Face Shape for a Flattering Look : How to Choose the Perfect Blouse Pattern According to Your Face Shape : Blouse Designs That Complement Your Face Shape : चेहऱ्याचा आकार लक्षात घेऊन त्यानुसार आपल्याला शोभून दिसतील असे ब्लाऊजचे पॅटर्न शिवण्यासाठी टिप्स...

चेहऱ्याचा आकार कसा आहे, गोल-चौकोनी की निमुळता? त्याप्रमाणे ‘असे’ शिवा ब्लाऊज, परफेक्ट लूकची युक्ती

अनेकदा आपण ब्लाऊजचे गळे छान वेगवेगळ्या आकर्षक पॅटर्नमध्ये शिवतो. परंतु ब्लाऊजचा गळा दिसताना फार सुंदर दिसतो पण तोच ब्लाऊज घातल्यावर त्याचा गळा किंवा नेक पॅटर्न आपल्याला अजिबात (How to Choose the Perfect Blouse Pattern According to Your Face Shape) शोभून दिसत नाही. कधी आपण मोठमोठ्या सेलिब्रिटी किंवा आपल्या जवळपासच्या मैत्रिणीने घाललेला ब्लाऊज पाहून त्यांचा नेकपटर्न जसाच्या तसा कॉपी करतो खरे पण मग आपलीच फजिती होते.

चेहऱ्याचा आकार कसा आहे, गोल-चौकोनी की निमुळता? त्याप्रमाणे ‘असे’ शिवा ब्लाऊज, परफेक्ट लूकची युक्ती

यासाठीच इतरांच्या ब्लाऊजचे नेकपटर्न कॉपी करण्यापेक्षा आपल्या चेहऱ्याचा आकार ओळखून ब्लाऊजचा गळा शिवल्यास तो आपल्याला अगदी परफेक्ट लूक देतो.

चेहऱ्याचा आकार कसा आहे, गोल-चौकोनी की निमुळता? त्याप्रमाणे ‘असे’ शिवा ब्लाऊज, परफेक्ट लूकची युक्ती

जर तुम्ही तुमच्या ब्लाऊजची नेकलाईन तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार ठेवली तर तुमचा लूक सर्वात सुंदर दिसेल. कोणत्या प्रकारच्या चेहऱ्यासोबत कोणत्या प्रकारची नेकलाईन चांगली दिसेल ते पाहूयात.

चेहऱ्याचा आकार कसा आहे, गोल-चौकोनी की निमुळता? त्याप्रमाणे ‘असे’ शिवा ब्लाऊज, परफेक्ट लूकची युक्ती

जर तुमचा चेहरा गोल असेल तर तुम्ही अशा नेकलाईनची निवड करावी ज्यामुळे तुमचा चेहरा लांब दिसेल. जर चेहरा गोल असेल तर तुम्ही व्ही-नेक, स्क्वेअर नेक, डीप यू-नेक आणि स्वीटहार्ट नेक अशा नेकलाईनचे ब्लाऊज किंवा ड्रेसचे गळे शिवू शकता. शक्यतो हाय नेक, बोट नेक, राउंड नेक अशा नेकलाईन्स टाळा.

चेहऱ्याचा आकार कसा आहे, गोल-चौकोनी की निमुळता? त्याप्रमाणे ‘असे’ शिवा ब्लाऊज, परफेक्ट लूकची युक्ती

जर तुमचा चेहरा अंडाकृती आकारात असेल तर तुम्हाला प्रत्येक प्रकारची नेकलाइन अगदी परफेक्ट शोभून दिसेल. याचबरोबर अंडाकृती चेहऱ्यासाठी बोट नेक, ऑफ-शोल्डर, डीप राउंड नेक, हॉल्टर नेक या नेकलाईन्स अधिक जास्त चांगल्या शोभून दिसतात. अंडाकृती चेहरा असलेल्यांना प्रत्येक प्रकारची नेकलाइन जरी चांगली दिसत असली तरीही त्यांनी खूप डीप नेकलाइन्स घालणे टाळावे.

चेहऱ्याचा आकार कसा आहे, गोल-चौकोनी की निमुळता? त्याप्रमाणे ‘असे’ शिवा ब्लाऊज, परफेक्ट लूकची युक्ती

जर तुमचा चेहरा चौकोनी असेल, म्हणजेच तुमचा जबडा रुंद असेल आणि तुमचा चेहरा चौकोनी असेल, तर तुम्ही नेकलाइनमधून तुमच्या चेहऱ्याला थोडा सॉफ्ट लूक द्यावा. या चेहऱ्याच्या आकाराच्या महिलांसाठी डीप यू-नेक, स्वीटहार्ट नेकलाइन, व्ही-नेक आणि वर्तुळाकार नेकलाइन शोभून दिसतात. अशा महिलांनी स्क्वेअर नेक, बोट नेक आणि हाय नेक घालू नये.

चेहऱ्याचा आकार कसा आहे, गोल-चौकोनी की निमुळता? त्याप्रमाणे ‘असे’ शिवा ब्लाऊज, परफेक्ट लूकची युक्ती

हार्ट शेप आकाराचे चेहरे असलेल्या महिलांचे कपाळ रुंद आणि हनुवटी टोकदार असते. जर तुमचा चेहरा हार्ट शेपमध्ये असेल तर तुम्ही बोट नेक, ऑफ-शोल्डर, स्क्वेअर नेक आणि हाय नेकची निवड करु शकता. अशा महिलांनी डीप व्ही-नेक आणि प्लंजिंग नेकलाइन्सपासून दूर राहावे.

चेहऱ्याचा आकार कसा आहे, गोल-चौकोनी की निमुळता? त्याप्रमाणे ‘असे’ शिवा ब्लाऊज, परफेक्ट लूकची युक्ती

डायमंड शेपचा चेहरा असलेल्या महिलांचे गाल थोडे उंच वर उचललेले असतात आणि त्यांचे कपाळ आणि हनुवटी अरुंद असते. यासाठी ऑफ-शोल्डर, डीप राउंड नेक, स्कूप नेक आणि स्वीटहार्ट नेकलाइन यांसारख्या पॅटर्नची निवड करावी. अशा महिलांनी हाय नेकलाइन आणि बोट नेकपासून दूर राहावे.