पारंपरिक पैठणीचा मॉडर्न थाट ! आता फ्रॉक - जंपसूट आणि को - ऑर्ड सेटपण पैठणीचे...
Updated:March 25, 2025 12:32 IST2025-03-25T12:15:57+5:302025-03-25T12:32:27+5:30
How to Convert Your Old Paithni Sarees into Modern Outfits : Old Paithni Saree Makeover Ideas : Dress From Old Paithni Saree Ideas : Old Paithni Sarees Converted Into Unique Party Indo Western Dresses : पैठणीचे मॉडर्न ड्रेस कुणाला आवडतात कुणाला नाही, पण पाहा पॅटर्न...

पैठणीला (Old Paithni Saree Makeover Ideas) संपूर्ण महाराष्ट्राचे महावस्त्र म्हणून ओळखले जाते, अशी ही पैठणी (How to Convert Your Old Paithni Sarees into Modern Outfits ) साडी प्रत्येकीलाच हवीहवीशी वाटते. सणावाराला किंवा एखाद्या खास प्रसंगी आपण ही ठेवणीतली पैठणी साडी नक्कीच नेसतो. परंतु काहीवेळा वर्षानुवर्षे तीच ती नेहमीची पैठणी साडी नेसून कंटाळा येतो. अशावेळी आपण या पैठणी साडीला थोडा मॉडर्न टच देत एक से बढकर एक असे प्रेमात पाडणारे आऊटफिट्सचे अनेक प्रकार शिवू शकतो.
जर तुमच्याकडे देखील एखादी अशीच ठेवणीतील जुनी पैठणी (Old Paithni Sarees Converted Into Unique Party Indo Western Dresses) असेल तर आपण कोणकोणत्या प्रकारचे मॉडर्न आऊटफिट शिवू शकतो ते पाहूयात.
जुन्या पैठणी साडीपासून तुम्ही असा सुंदरसा गाऊन शिवू शकता. हा गाऊन तुम्ही सणावाराला देखील घालू शकता. ज्यांना साडी नेसणे किंवा त्यात वावरणे कठीण वाटते अशांसाठी पैठणीचा गाऊन हा मस्त पर्याय आहे.
पैठणी साडीच्या पदरावर असणारे सुंदर, नाजूक नक्षीकाम आपण ड्रेसवर पॅचवर्क म्हणून देखील वापरू शकतो. अशा प्रकारे सुंदर पॅचवर्क आपण ड्रेसवर करून ड्रेसला अधिक आकर्षक आणि मॉडर्न पण पारंपरिक टच देऊ शकतो.
आपण पैठणी साडी पासून असा सुंदर घेरदार घागरा - चोली देखील शिवू शकतो. पैठणीवर असणाऱ्या नाजूक छोट्या बुट्टीमुळे घागरा अधिकच आकर्षक दिसतो.
पैठणी पासून आपण असे वेगवेगळ्या प्रकारचे वेस्टर्न आऊटफिट्स देखील शिवू शकतो. पैठणीचा गाऊन, पँट्स, धोती, वनपीस असे वेगवेगळ्या प्रकारचे मॉडर्न आऊटफिट्स दिसायला खूपच छान दिसतात. सोबतच तुम्हाला बोल्ड, स्टायलिश लूक देखील देतात.
पैठणी पासून तयार केलेला हा गाऊन तुम्हाला अधिक क्लासी आणि बोल्ड लूक देतो.
को - ऑर्ड सेट सध्या फारच ट्रेंडिंग असल्याने तुम्ही पैठणचा असा को - ऑर्ड सेट किंवा जंपसूट देखील नक्की ट्राय करु शकता.
जर तुम्हाला मॉडर्न आऊटफिट्स नको असतील तर तुम्ही अशा प्रकारे पैठणचा घेरदार अनारकली ड्रेस देखील शिवू शकता.
पैठणी साडीचा लेहेंगा देखील अतिशय देखणा दिसतो. लग्न समारंभ, सणवार किंवा एखाद्या खास प्रसंगी तुम्ही साडी न नेसता अशा प्रकारचा पैठणी साडीचा लेहेंगा देखील घालू शकता.
जर तुम्हाला मॉडर्न बोल्ड लूक हवा असेल तर तुम्ही पैठणी साडीचा असा शॉर्ट स्कर्ट आणि टॉप देखील शिवू शकता.
प्लाझो आणि क्रॉप टॉप सध्याची ट्रेंडी सुपरहिट फॅशन असल्याने पैठणी साडीचा असा ऑफशोल्डर क्रॉप टॉप आणि प्लाझो देखील आपण नक्की ट्राय करू शकता.
पैठणी साडीच्या पदरावर फार नाजूक आणि सुंदर असे नक्षीकाम केलेले असते. याच पदरापासून आपण असा सुंदर वनशोल्डर टॉप शिवू शकता. हा टॉप आपण प्लाझो, पँट्स, साडी किंवा लेहेंग्यावर देखील घालू शकता.
पैठणी साडीचे असे सुंदर शॉर्ट जॅकेट तुमच्या आऊटफिट्सला एक सुंदर व आकर्षक लूक देऊ शकतात.
पैठणी साडीचा असा कोट देखील तुम्ही शिवू शकता. हा कोट तुम्ही ऑफिसच्या पार्टीला पॅन्टवर घालून क्लासी आणि बॉसी लूक मिळवून देईल.