1 / 8हिवाळ्यातली लग्नसराई असली की कपडे कसे घालावे, हे बऱ्याचदा लक्षात येत नाही. कारण या काळात हुडहुडी भरवणारी थंडी असते.2 / 8या थंडीपासून संरक्षणही झालं पाहिजे आणि छान कपडे घालून आपण स्टायलिश, आकर्षकही दिसलं पाहिजे. हे दोन्ही उद्देश साध्य करायचे असतील तर हिवाळ्यात लग्नसमारंभासाठी कसे कपडे निवडायचे हे पाहा... बॉलीवूड अभिनेत्रींचे हे काही सुंदर विंटर लूक तुम्हाला नक्कीच तुमची स्टाईल ठरवायला मदत करतील. 3 / 8एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून नीतू कपूर ओळखल्या जातात. त्यांच्या स्टाईलसमोर तर हल्लीच्या अभिनेत्रीही फिक्या पडतात. त्यामुळेच नीतू कपूर यांचा हा खास लूक पाहा....4 / 8जॅकेट आणि लेहेंगा असा ड्रेस घालायचा असेल तर त्यासाठी काजोलसारखा असा लूकही करता येईल...5 / 8लेहेंगा, साडी यापेक्षा काही वेगळं हवं असेल तर कियारा आडवाणीचा हा हटके, ट्रेण्डी लूक पाहा. एखाद्या रिसेप्शनसाठी असा लूक केला तर चारचौघीत उठून दिसाल.6 / 8लेहेंगा आणि त्यावर हेवी डिझाईन असलेलं भरगच्चं आणि लांब बाह्यांचं ब्लाऊज हा लूकही तुम्ही करू शकता.7 / 8सारा अली खानचा हा लूकही तुम्हाला आवडू शकतो. यामुळे थंडीपासून तर संरक्षण होईलच पण दिसायलाही अगदी आकर्षक वाटेल. 8 / 8साडी नेसायची असेल तर त्यावर असं आकर्षक जॅकेट घ्या.. साडी विथ जॅकेट हा ट्रेण्डही सध्या खूप हिट आहे.