स्किन टोननुसार योग्य रंगांच्या कपड्यांची निवड कशी कराल ? ४ टिप्स, निवडा परफेक्ट कलरचे ड्रेस...
Updated:March 10, 2025 18:06 IST2025-03-10T17:58:04+5:302025-03-10T18:06:37+5:30
How to dress according to your skin tone : How To Pick The Perfect Color For Your Skin Tone : How to choose the right color of clothes according to your skin tone : How to Find The Best Colors to Wear For Your Skin Tone : कपड्यांचा रंग निवडताना गोंधळू नका, आपला स्किन टोन ओळखून कोणत्या रंगाच्या कपड्यांची निवड करावी ते पाहा...

कपड्यांची खरेदी करताना ( How to choose the right color of clothes according to your skin tone) आपण त्याच्या पॅटर्नसोबतच त्याचा रंगाचा देखील तितकाच विचार करतो. आपल्या स्किन टोननुसार आपल्यावर कोणते रंग अधिक खुलून दिसतील किंवा कोणते रंग आपल्या स्किन टोनला मॅच करतील याबाबत आपण सगळेच नेहमी गोंधळलेले असतो.
आपल्या स्किन टोननुसार (How to dress according to your skin tone) कोणत्या रंगाच्या कपड्यांची निवड करावी याबाबत अनेकदा गोंधळ ( How to Find The Best Colors to Wear For Your Skin Tone) उडतो. असे होऊ नये यासाठी प्रत्येक स्किन टोनला कोणत्या रंगाचे कपडे अधिक शोभून दिसतील ते पाहूयात.
१. गोरा रंग :-
जर तुमचा स्किन टोन गोरा असेल तर अशा रंगांची निवड करा ज्यामुळे तुमच्या स्किन टोनची नैसर्गिक चमक अधिकच उठून दिसेल. योग्य रंगांची निवड केल्याने तुमच्या व्यक्तिमत्वात अधिकच फरक पडलेला दिसून येईल. बेबी पिंक, लवेंडर, पावडर ब्लू, रॉयल ब्लू, एमराल्ड ग्रीन, बरगंडी, बीज, ग्रे, ब्राऊन असे रंग तुमच्या स्किन टोनवर अधिकच खुलून दिसतील. शक्यतो, पांढरा - पिवळा असे फिके रंग वापरणे टाळावे यामुळे तुमचा स्किन टोन उठून न दिसता अधिक फिका दिसतो.
२. गव्हाळ रंग :-
जर तुमचा स्किन टोन गव्हाळ असेल तर तुमच्यावर जवळपास सगळेच रंग अगदी छान शोभून दिसतील. असे असले तरी आणखी काही रंगांचे असे शेड्स आहेत जे तुमच्या स्किन टोनला अधिक जास्त चांगले दिसतील. मस्टर्ड, ऑलिव ग्रीन, टेराकोटा, नेवी ब्लू, बरगंडी, प्लम, कोरल, पीच, रेड हे रंग गव्हाळ स्किन टोनवर जास्त चांगले दिसतील. हलके न्यूट्रल शेड्स जसे की, हल्का ब्राऊन किंवा ऑफ-व्हाइट असे रंग तुमच्या स्किन टोनला अधिकच डल दिसू शकतात, यासाठी असे रंग घालणे टाळावे.
३. सावळा किंवा डस्की रंग :-
तुमचा स्किन टोन जर सावळा किंवा डस्की असेल तर अशा रंगांची निवड करा जे रंग तुमच्या स्किन टोनला अगदी परफेक्ट कॉंट्रास्ट असतील. असे रंग तुमचा लूक अधिकच ग्लॅमरस करण्यास मदत करतील. कोबाल्ट ब्लू, फुशिया, इलेक्ट्रिक यल्लो, वाइन रेड, एमराल्ड ग्रीन, रूबी रेड, डीप पर्पल, गोल्ड, कॉपर, ब्रॉन्ज यांसारख्या रंगांची निवड करावी. खूप जास्त डार्क शेड्स, जसे की काळा आणि ब्राऊन रंग तुमच्या स्किन टोनमध्ये मर्ज होऊ शकतात त्यामुळे अशा रंगांचे कपडे घालणे टाळावे.
४. वेन टोन :-
जर तुमची स्किन हलकीशी पारदर्शक म्हणजेच तुमच्या हातांच्या नसांचा निळा - हिरवा रंग दिसत असेल तर तुमचा स्किन टोन वेन टोन आहे असे समजावे. याला कुल स्किन टोन देखील म्हटले जाते. जर तुमच्या नसांचा रंग निळा असेल तर ब्लू, पर्पल, सिल्वर अशा कुल रंगांची निवड करावी. जर तुमच्या नसांचा रंग हिरवा असेल तर तुमचा स्किन टोन हा वॉर्म स्किन टोन आहे. अशावेळी रेड, येलो, गोल्डन अशा वॉर्म रंगाचे कपडे तुमच्यावर अधिक खुलून दिसतील.