साध्या स्वस्त साड्या नेसून दिसा स्टायलिश! बघा आलिया भटचे ८ सुंदर लूक By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2023 1:41 PM 1 / 8१. साडीमध्ये आकर्षक दिसायचं असेल, तर साडी नेहमी महागच असली पाहिजे, असं काही नाही. साध्या आणि अगदी स्वस्त असणाऱ्या साड्यांमध्येही आकर्षक दिसता येतं, हे आलियाने अगदी परफेक्ट दाखवून दिलं आहे.2 / 8२. सध्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातील आलियाचे साडी लूक खूपच चर्चेत आहेत. चित्रपटात आलियाने नेसलेल्या साड्या डिझायनर आहेत. त्यामुळे त्या महागड्याच असणार. पण त्या साड्यांशी मिळत्याजुळत्या साड्या हजार- दिड हजार रुपयांमध्येही मिळू शकतात. अशा स्वस्तात मस्त साड्या नेसूनही स्टायलिश, आकर्षक कसं दिसायचं ते पाहूया...3 / 8३. या चित्रपटात आलियाने प्लेन साडी नेसण्याला प्राधान्य दिलं आहे. बऱ्याचदा आपण अशा साड्या नेसणं टाळतो. पण अशी एखादी प्लेन साडी आपल्या कलेक्शनमध्ये असायला हरकत नाही.4 / 8४. प्लेन साडी किंवा शिफॉन, जॉर्जेट या प्रकारातली साडी असेल तर शक्यतो पदर फ्लोटिंग प्रकारचा ठेवावा. पिनअप पदरापेक्षा फ्लोटिंग पदर जास्त स्टायलिश वाटेल.5 / 8५. साडी प्लेन आणि फिक्या रंगाची. पण ब्लाऊज मात्र डिझायनर पद्धतीचं आणि गडद रंगाचं... असंही कॉम्बिनेशन मस्त दिसतं. 6 / 8६. आलियाचे हे काही लूक्स पाहून ऑक्सिडाईज झुमक्यांची फॅशन पुन्हा येणार असं दिसतं. शिफॉन, जॉर्जेट साड्यांवर असे झुमके ट्राय करून बघा. पण त्यावेळी गळ्यात मात्र काहीच घालू नका किंवा अगदी नाजूकसं काहीतरी घाला.7 / 8७. आपली साडी साधी असेल तर मेकअपवर थोडा जास्त फोकस करावा लागतो. कारण साध्या साडीवर खूप हेवी मेकअप अजिबात चांगला दिसत नाही आणि मेकअपच नाही केला तर आपण उठून दिसत नाही. त्यामुळे मेकअप खूप हेवी पण नको आणि अगदीच हलका पण नको. अशावेळी लिपस्टिक आणि डोळ्यांचा मेकअप करण्यावर भर द्या. 8 / 8८. स्टायलिश दिसण्यासाठी बऱ्याचदा आपण मोठी टिकली लावणं टाळतो. पण मोठ्या टिकलीचंही एक वेगळंच सौंदर्य आहे, हे या फोटोतून दिसतं. कधी कधी अशी मोठी टिकली ट्राय करायलाही हरकत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications