पांढरी साडी अंगावर खुलतच नाही? ५ टिप्स, मेकअप- ज्वेलरीमधे करा छोटासा बदल- दिसा खूप सुंदर

Published:August 14, 2023 06:02 PM2023-08-14T18:02:09+5:302023-08-14T18:09:17+5:30

पांढरी साडी अंगावर खुलतच नाही? ५ टिप्स, मेकअप- ज्वेलरीमधे करा छोटासा बदल- दिसा खूप सुंदर

१. पांढरी किंवा मोतिया रंगाची साडी अंगावर खुलतच नाही, असा बऱ्याच जणींचा गैरसमज असतो. त्यामुळे त्या सहसा पांढरी साडी नेसणे टाळतात. आपल्या कलेक्शनमध्ये असणारी पांढरी साडी केवळ १५ ऑगस्ट (happy independence day 2023), २६ जानेवारी अशा ठराविक दिवसांनाच बाहेर येते आणि त्यानंतर पुन्हा वर्षभर कपाटात ठेवून दिली जाते. पण पांढरी साडीही अंगावर खूप छान दिसू शकते. अगदी गव्हाळ, सावळ्या रंगालाही पांढरा, मोतिया रंग खुलून दिसतो. त्यासाठीच बघा या काही खास टिप्स.

पांढरी साडी अंगावर खुलतच नाही? ५ टिप्स, मेकअप- ज्वेलरीमधे करा छोटासा बदल- दिसा खूप सुंदर

२. आजकाल ऑक्सिडाईज ज्वेलरीचा खूप ट्रेण्ड आहे. त्यामुळे पांढऱ्या साडीवरही ऑक्सिडाईज ज्वेलरी ट्राय करून बघा. पण त्यासाठी साडीवर थोडीशी ग्रे रंगाची छटा हवी. साडी जर सोनेरी काठांची असेल तर त्यावर गोल्डन झुमके उठून दिसतील.

पांढरी साडी अंगावर खुलतच नाही? ५ टिप्स, मेकअप- ज्वेलरीमधे करा छोटासा बदल- दिसा खूप सुंदर

३. पांढऱ्या साडीवर खूप हेवी मोत्याचे दागिने सगळ्यांनाच शोभून दिसत नाहीत. त्यामुळे असे दागिने टाळा. त्याऐवजी गळ्यात एखादीच नाजूकशी मोत्याची सर, कानात छोटेसे मोती असं जास्त छान दिसेल.

पांढरी साडी अंगावर खुलतच नाही? ५ टिप्स, मेकअप- ज्वेलरीमधे करा छोटासा बदल- दिसा खूप सुंदर

४. पांढऱ्या साडीचे काठ ज्या रंगाचे असतील त्या रंगाचे दागिने घालण्यास प्राधान्य द्या. पण ते रंग सोबर असावेत. कारण पांढऱ्या साडीवर खूप भडक किंवा गडद रंगाचे दागदागिने चांगले दिसत नाहीत. बटबटीत वाटतात.

पांढरी साडी अंगावर खुलतच नाही? ५ टिप्स, मेकअप- ज्वेलरीमधे करा छोटासा बदल- दिसा खूप सुंदर

५. पांढऱ्या साडीवरचा मेकअपही साधाच हवा.. खूप ग्लॉसी आणि डार्क शेड मेकअप टाळावा. न्यूड शेड किंवा हलक्या गुलाबी रंगातच जास्तीत जास्त मेकअप करा..

पांढरी साडी अंगावर खुलतच नाही? ५ टिप्स, मेकअप- ज्वेलरीमधे करा छोटासा बदल- दिसा खूप सुंदर

६. अशा प्रकारच्या साड्यांवर खूप चापून- चोपून केलेली हेअरस्टाईल चांगली दिसत नाही. त्यामुळे केसांना बन घालणार असाल तर तो थोडा फुगीर असावा. किंवा मेस्सी बन प्रकारातला हवा.