1 / 9लग्नसराईच्या काळात स्त्रियांना नटायला अधिक आवडते. जवळच्या कुणाच्या लग्नात जायचे असेल तर नेमके कोणते कपडे घ्यावे असा प्रश्न वारंवार पडतो. कपाटात इतक्या साड्या आणि ड्रेस असतात की, पुन्हा तेच घालायचा देखील कंटाळा येतो. (How to Reuse Wedding Lehenga for Wedding Season)2 / 9जर आपल्याकडे ही भरजरी घागरा असेल तर त्याची वेगळ्या पद्धतीने फॅशन करुन आपण नवीन ट्रेंड सेट करु शकता. यामध्ये आपण अधिक उठून दिसू. (Trendy Ways to Wear Your Wedding Lehenga Again)3 / 9आपला घागरा आणि ब्लाउजचा पुढचा भाग सारखाच ठेवून आपण त्याचा लूक चेंज करु शकतो. यामध्ये आपण भरतकाम केलेला दुप्पटा वापरु शकतो. आपण याला दोन्ही खांद्यावर घेऊ शकतो. 4 / 9आपल्याला इंडो वेस्टर्न लूक हवा असेल तर दुप्पट्याऐवजी आपण वर्क केलेले जॅकेट घालू शकता. यामुळे आपला संपूर्ण लूक चेंज होईल. 5 / 9आपल्याला स्कर्ट घालायला आवडत असेल तर आपल्या लेहेंग्यातील फ्लेर्ड असणारा भाग काढून आपण त्याचा पुन्हा वापर करु शकतो. 6 / 9घागरा सिंपल किंवा प्लेन असेल तर त्यावर आपण भरतकाम करुन त्याला नवीन लूक देऊ शकतो. तसेच यावर सूट होणारे रंगाचे भरलेले ब्लाऊज घालू शकतो. 7 / 9आपण घागऱ्याच्या ब्लाऊजचा प्लेन साडीसाठी वापर करु शकतो. ज्यामुळे आपल्या सौंदर्यात भर पडेल. 8 / 9आपल्याला घागऱ्याला आपण अनाकरलीचा लूक देऊ शकतो. ब्लाऊजाला स्कर्ट फिटिंग करुन याला वापरता येईल. 9 / 9फ्यूजन लूक हवा असेल तर आपण प्लेन सॅटन शर्टसोबत लेहेंगा घालू शकतो. त्यावर ज्वेलरी किंवा मोठे कानातले घालता येईल.