साडीचे मोठे काठ वापरुन ब्लाऊजला द्या नवा लूक, नेहमीचे ब्लाऊज दिसतील सुंदर आणि आकर्षक...
Updated:March 17, 2025 16:57 IST2025-03-17T15:46:47+5:302025-03-17T16:57:42+5:30
How to use blouse border for blouse design : Best Ideas to reuse old saree border to design New Blouses,Neck : How to Reuse saree border to make New Blouses : मोठ्या काठाच्या साड्या घेणे आपण शक्यतो टाळतो, परंतु हेच सुंदर काठ तुमच्या ब्लाऊजला हटके लूक देऊ शकतात...

'साडी' हा प्रत्येक महिलेच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. साडी खरेदी करताना त्या साडीला असणारा काठ आपण अगदी (How to use blouse border for blouse design) बारकाईने पाहून मगच ती साडी खरेदी करतो. काहीवेळा या साड्यांना फार मोठे काठ असतात.
मोठ्या काठापदराची साडी प्रत्येकीलाच शोभून (Best Ideas to reuse old saree border to design New Blouses,Neck) दिसेल असे नाही. यासाठी आपण शक्यतो बारीक व नाजूक काठ असणाऱ्या साड्यांचीच निवड करतो. परंतु जर आपल्याकडे मोठ्या काठापदराची साडी असेल तर त्याचा काठ वापरुन आपण नेहमीच्या ब्लाऊजला अधिक आकर्षक व सुंदर लूक देऊ शकतो.
मोठ्या काठापदराच्या साडीचा काठ वापरुन आपण ब्लाऊजला (How to Reuse saree border to make New Blouses) एक से बढकर एक नवीन हटके लूक देऊ शकतो, कसे ते पाहूयात.
आपण अशाप्रकारे साडीचा काठ वापरुन ब्लाऊजच्या मागच्या आणि पुढच्या गळ्याला अधिक सुंदर व आकर्षक लूक देऊ शकता.
साडीचा काठ जर मोठा असेल तर आपण ब्लाउजच्या मागच्या गळ्याला अशी काठाची बॉर्डर लावून ब्लाऊज डिझाईन करु शकता.
जर तुम्ही बोट नेकचा ब्लाऊज शिवणार असाल तर आपण गळ्याभोवती अशा प्रकारे साडीच्या काठचा वापर करून ब्लाऊजचे नवीन पॅटर्न तयार करु शकता.
आपणं अशा प्रकारे फक्त बॉर्डर कापून ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला जोडून हटके लूक देऊ शकता.
ब्लाऊजचा मागचा गळा वी - नेकचा शिवून दोन्ही खांद्याला जोडणारी अशी एक बॉर्डर पट्टी काठाची लावू शकता. याचबरोबर या काठाचे लटकन किंवा हाताला फ्रिल म्हणून देखील वापरु शकता.
जर साडीचा काठ फारच मोठा असेल तर आपण अशाप्रकारे या काठाचा वापर करुन ब्लाऊज देखील शिवू शकता.
जर आपल्याला फारसा डिझाईन न केलेला साधा सिम्पल ब्लाऊज हवा असेल तर आपण मागच्या गळ्याभोवती असा साडीचा काठ लावून नेहमीच्या ब्लाऊजला सुंदर लूक देऊ शकता.
जर आपल्याला साडीचा काठ ब्लाऊजच्या हातांवर किंवा गळ्याभोवती लावायचा नसेल तर आपण खांद्यावर देखील अशा प्रकारे काठ लावू शकता.
जर आपल्याला डीप आणि बोल्ड लुकचा ब्लाऊज हवा असेल तर आपण फक्त साडीचा काठ वापरुन अशा प्रकारचा ब्लाऊज शिवू शकतो.
ब्लाऊजला ट्रेडीशन लूक हवा असेल तर आपण अशा प्रकारे पाठीवर काठ लावून त्यावर खडे, मोती किंवा मणी लावू शकता.