Indo western look ideas for garba dandiya in navratri, How to do indo western look for dandiya?
दांडियासाठी इंडो- वेस्टर्न लूक करायचाय? बघा ६ हटके लूक, दिसा स्टायलिश आणि फॅशनेबलPublished:October 17, 2023 01:23 PM2023-10-17T13:23:39+5:302023-10-17T13:28:58+5:30Join usJoin usNext दांडिया किंवा गरबासाठी तेच ते नेहमीचं ड्रेसिंग करायचं नसेल, काहीतरी वेगळं, हटके, चारचौघात उठून दिसणारं असं काही करायचं असेल तर असा इंडो- वेस्टर्न लूक करू शकता. यामुळे नक्कीच स्टायलिश आणि फॅशनेबल दिसाल... काहीतरी एकदमच वेगळं, भन्नाट करायचं असेल तर असं काही तरी करू शकता. डोक्यावर पगडी किंवा फेटा, गॉगल आणि धोती पॅण्ट असं काही कराल तर सगळ्यांपेक्षा नक्कीच वेगळं दिसाल.. सिंपल लूक करायचा असेल तर असा आलियासारखा पटियाला, शॉर्ट कुर्ता आणि जॅकेट असं काही करू शकता... पॅण्ट- शर्ट घालून त्यावर फक्त वेगळ्या पद्धतीने ओढणी लपेटून घेतली तरी असा स्टायलिश लूक होऊ शकतो. फक्त असा लूक करण्यासाठी ओढणी खूप भरगच्च आणि हेवी वर्क असणारी पाहिजे... धोती पॅण्ट आणि जॅकेट असा तापसी पन्नूसारखा लूकही एकदम छान दिसतो. असं काही तरी वेगळं केलं तर ते आणखी उठून दिसण्यासाठी त्यावरचे दागिनेही ट्रेण्डी असावेत, याची मात्र काळजी घ्या. थोडंसं शोधलं तर सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर असे ड्रेसही मिळत आहेत. किंवा हे डिझाईन पाहून तुमच्या नेहमीच्या टेलरकडूनही तुम्ही ते अर्जंट एक- दोन दिवसांत शिवून घेऊ शकता. धोती पॅण्ट किंवा जीन्स आणि त्यावर असं एखादं स्टायलिश जॅकेट असं ही तुम्ही करू शकता. टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव 2023नवरात्री गरबा २०२३फॅशनब्यूटी टिप्सगरबादांडियाNavratri Mahotsav 2023Garba CornerfashionBeauty TipsgarbaDandia