दांडियासाठी इंडो- वेस्टर्न लूक करायचाय? बघा ६ हटके लूक, दिसा स्टायलिश आणि फॅशनेबल By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2023 1:23 PM 1 / 7दांडिया किंवा गरबासाठी तेच ते नेहमीचं ड्रेसिंग करायचं नसेल, काहीतरी वेगळं, हटके, चारचौघात उठून दिसणारं असं काही करायचं असेल तर असा इंडो- वेस्टर्न लूक करू शकता. यामुळे नक्कीच स्टायलिश आणि फॅशनेबल दिसाल...2 / 7काहीतरी एकदमच वेगळं, भन्नाट करायचं असेल तर असं काही तरी करू शकता. डोक्यावर पगडी किंवा फेटा, गॉगल आणि धोती पॅण्ट असं काही कराल तर सगळ्यांपेक्षा नक्कीच वेगळं दिसाल..3 / 7सिंपल लूक करायचा असेल तर असा आलियासारखा पटियाला, शॉर्ट कुर्ता आणि जॅकेट असं काही करू शकता...4 / 7पॅण्ट- शर्ट घालून त्यावर फक्त वेगळ्या पद्धतीने ओढणी लपेटून घेतली तरी असा स्टायलिश लूक होऊ शकतो. फक्त असा लूक करण्यासाठी ओढणी खूप भरगच्च आणि हेवी वर्क असणारी पाहिजे...5 / 7धोती पॅण्ट आणि जॅकेट असा तापसी पन्नूसारखा लूकही एकदम छान दिसतो. असं काही तरी वेगळं केलं तर ते आणखी उठून दिसण्यासाठी त्यावरचे दागिनेही ट्रेण्डी असावेत, याची मात्र काळजी घ्या.6 / 7थोडंसं शोधलं तर सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर असे ड्रेसही मिळत आहेत. किंवा हे डिझाईन पाहून तुमच्या नेहमीच्या टेलरकडूनही तुम्ही ते अर्जंट एक- दोन दिवसांत शिवून घेऊ शकता.7 / 7धोती पॅण्ट किंवा जीन्स आणि त्यावर असं एखादं स्टायलिश जॅकेट असं ही तुम्ही करू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications