1 / 8लग्नसराई किंवा कोणत्याही कार्यक्रमात बांगड्यांशिवाय अपूर्ण आहे. हिरवा चुडा हा सौभाग्याचं लेण समजला जातो. पूर्वी फक्त हिरव्या आणि लाल रंगाच्या बांगड्यांचा पर्याय असायचा. आता बाजारात अनेक नवीन पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात. (Latest Moti Bangle Trends)2 / 8आपण जर लग्नात नऊवारी साडी नेसत असून तर त्यावर मोत्याच्या बांगड्या अधिक उठून दिसतील. पाहूयात नवीन डिझाईन्स (Stylish Pearl Bangle Designs)3 / 8कडा पर्ल बांगडी आहे. यामध्ये फक्त सिंगल कडा असतो. तुम्ही हा कडा हिरव्या बांगड्यांच्या मागे पुढे घालू शकता. यामध्ये हिरवे डायमंड आणि मोती आहेत. 4 / 8गजरा बांगड्या किंवा गजरा फुलांच्या माळासारख्या असणाऱ्या या मोतीच्या बांगड्या आपल्या साजशृंगारात भर घालतात. आपण हे सिंगल पीस म्हणून घालू शकतो. किंवा यात साडीच्या रंगानुसार बांगड्या घालू शकतो. 5 / 8जर आपली साडी साधी सिंपल असेल तर आपला लूक उठून दिसण्यासाठी आपण स्टेटमेंट लूक देऊ शकतो. सोनेरी बेस असलेल्या क्रिस्टल्सने सजवलेल्या आणि बॉर्डवर मोत्यांची नाजूक रेषा असणार्या बांगड्या सौंदर्यात भर घालतील. 6 / 8कुंदनच्या पॅटर्नमध्ये देखील मोत्याच्या बांगड्या मिळतात. एकच गोठ हातात घातला तर शोभून दिसेल. 7 / 8गोल्ड मोतीच्या बांगड्या साड्या किंवा ड्रेसवर छान दिसतील. या बांगड्या ऑनलाइन शॉपिंग किंवा बाजारात सहज मिळतील. 8 / 8सिल्व्हर पर्ल बांगडी सेटमध्ये चार सिंपल डिझाईन्सच्या बांगड्या मिळतील. ज्यावर चांदीचा वर्ख केला आहे. पारंपारिक लूकवर या बांगड्या छान दिसतील.