Join us   

कॉटन साडीवर घालायला कलमकारी ब्लाऊज शिवायचं? बघा ८ सुंदर पॅटर्न्स- दिसाल एकदम स्टायलिश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2024 5:39 PM

1 / 10
हिवाळ्यात कॉटन, ज्यूट या प्रकारातल्या साड्या खूप ट्रेण्डी असतात. या साड्यांवर कलमकारी प्रकारातले ब्लाऊज खूप छान आकर्षक, स्टायलिश लूक देतात (latest pattern in kalamkari blouse). पण कलमकारी ब्लाऊज नेमकं कसं शिवावं, असा प्रश्न पडला असेल तर हे काही डिझाईन्स नक्की पाहा..(kalamkari blouse designs)
2 / 10
कलमकारी ब्लाऊज शिवताना बऱ्याचदा मागचा गळा अगदी लहान ठेवला जातो. किंवा तुम्ही त्याला बंद गळ्याचं ब्लाऊज असंही म्हणू शकता.(kalamkari blouse patterns of latest designs and fashion)
3 / 10
कलमकारी कपडा आणि साधा कपडा असं कॉम्बिनेशन करून असं सुरेख ब्लाऊजही शिवता येतं.
4 / 10
हल्ली कलमकारी कपडा आणि त्याच्या जोडीला सिल्कचा एखादा कपडा घेऊन त्यावर थोडं वर्क केलं जातं. असं ब्लाऊज सिल्कच्या साडीवरही खूप छान दिसतं.
5 / 10
थोडा सुपरस्टायलिश लूक हवा असेल तर पुढचा गळा बंद आणि मागचा गळा मोठा अशा प्रकारातलं ब्लाऊजही तुम्ही शिवू शकता.
6 / 10
हे एक वेगळ्या पॅटर्नचं ब्लाऊज पाहा. हल्ली अशा प्रकारच्या मागच्या गळ्याच्या डिझाईनची खूप फॅशन आहे. अशा पद्धतीचं ब्लाऊज परफेक्ट फिटींगचं झालं तर ते नक्कीच खूप आकर्षक दिसतं.
7 / 10
कलमकारी कपडा आणि त्यावर एम्ब्रॉयडरी किंवा कुंदन वर्क, मोती वर्क, मिरर वर्क, थ्रेड वर्क असे प्रकारही सध्या खूप ट्रेण्डी आहेत. अशा पद्धतीचं ब्लाऊज लग्नसराईमध्ये सिल्कच्या साडीवरही खूप छान दिसेल.
8 / 10
बाह्यांना अशा पद्धतीची झालर किंवा फ्रिल लावलेलं एखादं ब्लाऊज आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवं. या प्रकारच्या ब्लाऊजमध्ये तुम्ही आहात त्यापेक्षा नक्कीच कमी वयाच्या दिसाल.
9 / 10
कलमकारी ब्लाऊजची एक खासियत अशी आहे की ते तुम्ही विशिष्ट पद्धतीने शिवलं तर एकदम फॉर्मल लूक देतं. हे ब्लाऊजही त्याच प्रकारचं आहे. ऑफिसमध्ये घालण्यासाठी ते अगदी परफेक्ट ठरेल.
10 / 10
फॉर्मल लूकसाठी किंवा ऑफिसमध्ये घालण्यासाठी म्हणून कलमकारी ब्लाऊज शिवणार असाल तर हे आणखी एक सुंदर डिझाईन पाहा.
टॅग्स : फॅशनसाडी नेसणेस्टायलिंग टिप्स