हाय रे तेरा घागरा! कियारा अडवाणीचा रत्नजडीत घागरा बनवायला लागले ४००० तास, देखण्या क्रिस्टलचं सुंदर काम... Published:February 23, 2023 03:43 PM 2023-02-23T15:43:29+5:30 2023-02-23T16:06:44+5:30
Kiara Advani’s Golden Lehenga By Manish Malhotra Took 4000 Hours To Be Crafted : कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मलहोत्रा यांचे नुकतेच लग्न झाले, कियाराच्या स्टाइल स्टेटमेंटची सध्या चर्चा आहे. बॉलिवूडमधील फेमस कपल कियारा आणि सिद्धार्थ हे नुकतेच विवाहबद्ध झाले आहेत. जैसलमेरमधील मोठ्या राजवाड्यात या जोडप्याचा शाही विवाह सोहळा अतिशय दिमाखात पार पडला. कियाराच्या स्टाइल स्टेटमेण्टसह तिच्या खास घागऱ्याचीही चर्चा आहे(Kiara Advani’s Golden Lehenga By Manish Malhotra Took 4000 Hours To Be Crafted).
नुकतेच कियाराने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन संगीत सोहोळ्याचे काही फोटोज शेअर केले आहेत. संगीत सोहोळ्यादरम्यान कियाराने सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेला लॅव्हिश दिसणारा गोल्डन रंगाचा घागरा परिधान केला आहे.
कियाराचा फ्लोअर स्वीपिंग पद्धतीचा लेहेंगा संपूर्णपणे तयार करण्यासाठी एकूण ४००० तासांचा कालावधी लागला आहे. या गोल्डन रंगाच्या चमचमत्या लेहेंग्यावर ९८००० स्वरोवस्की क्रिस्टल (Swarovski Crystals) लावण्यात आले आहेत. या लेहेंग्यावर तिने व्ही नेक पॅटर्न व फुल स्लिव्ह्ज असलेला चमचमता ब्लाऊज परिधान केला आहे. या ब्लाऊजवर शिमरी सिक्वीन वर्क केले आहे. त्याचप्रमाणे टॅसेल्स पद्धतीचे व हेव्ही बीड्स लावून हे ब्लाऊज अधिकच आकर्षक बनवले.
आपल्या रत्नजडित लेहेंग्याला परफेक्ट मॅचिंग होईल असा सुंदर नेकलेस कियाराने घातला आहे. ज्यामुळे तिचे सौंदर्य अधिकच उठावदार दिसत आहे. कियाराने रुबी पेंडंट असलेला नेकलेस, डायमंड रिंग, हाय हिल्स घालून आपला लूक पूर्ण केला आहे. कियाराने साईड पार्टीशन करून केसांना वेव्ही पद्धतीचा लूक दिला आहे. शिमरी आयशॅडो, विंग आयलायनर, न्यूड लिपस्टिक शेड, गालांवर ब्लश शेड लावून कियाराने आपल्या सौंदर्यात अधिक भर घातली आहे.
सिद्धार्थ देखील काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये अधिकच रोमँटिक दिसत होता. सिद्धार्थने काळ्या रंगाचा पिनस्ट्राइप - प्रिंट बटण असलेला फुल स्लिव्ह्जचा कुर्ता परिधान केला होता. या कुर्त्यावर त्याने बंद गळ्याचे जॅकेट घातले होते. समोरून संपूर्णपणे ओपन असणाऱ्या या जॅकेटवर गोल्डन फुलांची ब्रॉकेड एम्ब्रॉयडरी केलेली होती.