Join us

Blouse Designs Neckline : ‘इतके’ सुंदर नेकलाइन्स पॅटर्न तुम्ही पाहिलेच नसतील! पाहा एकदम ट्रेण्डी डिझाइन्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2025 15:38 IST

1 / 11
आपल्यापैकी बऱ्याचजणींना कपड्यांची निवड करताना वेगवेगळ्या बॉलिवूड अभिनेत्रींना (Latest Blouse Neckline Inspired By Bollywood Actresses To Look Like A Diva ) फॉलो करण्याची सवय असते. बरेचदा आपल्याला बॉलिवूड अभिनेत्री साडी - लेहेंग्यावर जशा पॅटर्नचे ब्लाऊज घालतात तसेच आपल्याला देखील घालावेसे वाटतात. या अभिनेत्रींनी साडीवर घातलेले वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज आपण देखील घालू शकतो.
2 / 11
यासाठी साडी आणि लेहेंग्यावर घालता येतील असे बॉलिवूड अभिनेत्रींचे एक से बढकर एक ब्लाऊज ( Bollywood Actresses Blouse Designs & Neckline That Give Us Major Fashion Goals For Indian Weddings) पॅटर्न पाहूयात.
3 / 11
जर तुम्हाला साडी किंवा लेहेंगा घातल्यावर क्लासी लूक हवा असेल तर आपण अशा पद्धतीचा कॉलर नेक पॅटर्नचा ब्लाऊज शिवू शकता. अशा प्रकारच्या नेक पॅटर्नसोबत पफ स्लिव्ह्ज पॅटर्नच्या बाह्या देखील खूप सुंदर दिसतील.
4 / 11
जर एखाद्या हेव्ही किंवा बोल्ड वर्क असणाऱ्या साडी किंवा लेहेंग्यावर आपण बॅकलेस सिंगल हुक डिजाईनचा अशा पद्धतीचा ब्लाऊज शिवू शकतो. बॅकलेस सिंगल हुक डिझाईनचा ब्लाऊज तुमच्या साडी किंवा लेहेंग्याला एकदम बोल्ड लूक देऊ शकेल.
5 / 11
जर तुमची साडी किंवा लेहेंगा नेटचा असेल तर आपण अशा प्रकारे नेकलाईन असणारा परफेक्ट मॅचिंग ब्लाऊज शिवू शकता. प्लेन किंवा नेटेड साडीवर असा फ्रिल नेकलाईन पॅटर्न असणारा ब्लाऊज अगदी उठून दिसेल. तुमच्या हेव्ही वर्क साडी आणि लेहेंग्याला फ्रिल नेकलाईन ब्लाऊज पॅटर्नमुळे एक वेगळाच हटके लूक मिळेल.
6 / 11
प्लेन साडी किंवा लेहेंग्यावर आपण अशा पद्धतीचा ऑफ-शोल्डर क्रोशिया ब्लाऊज घालू शकता. यामुळे तुमच्या साडी आणि लेहेंग्याला एक मस्त क्लासी लूक मिळेल.
7 / 11
जर तुम्हाला ब्लाऊजचे एकदम हटके पॅटर्न न करता नेहमीचे साधे सिम्पल पॅटर्न शिवायचे असेल तर आपण या सिम्पल नेकलाईन ब्लाऊज पॅटर्नची निवड करु शकता. साडी किंवा लेहेंग्यावर जर साध्या पॅटर्नचे ब्लाऊज शिवायचे असेल तर तुम्ही या प्रकारच्या नेकलाईनची निवड करु शकता.
8 / 11
व्ही - नेकलाईन पॅटर्नचा ब्लाऊज साडी आणि लेहेंग्यावर अगदी उठून दिसतो. व्ही - नेकलाईन पॅटर्न ही फार साधीसुधी वाटत असली तरीही ती कायमच ट्रेंड मध्ये असते. यासाठी आपण या व्ही - नेकलाईन पॅटर्नची निवड करु शकता.
9 / 11
साडी आणि लेहेंगा या दोन्हींवर स्वीटहार्ट नेकलाईन पॅटर्नचे ब्लाऊज अतिशय उठून दिसतात. त्यामुळे बोल्ड आणि हटके लूकसाठी आपण स्वीटहार्ट नेकलाईन पॅटर्नचे ब्लाऊज देखील शिवू शकता.
10 / 11
जर तुम्हाला साडी आणि लेहेंग्यावर एकदम साधा - सिम्पल लूक हवा असेल तर आपण या प्रकारचे क्लोज राऊंड नेकलाईन पॅटर्नचे ब्लाऊज शिवू शकता. जर तुम्हाला खूप डिप गळ्याचे ब्लाऊज नको असतील तर हा उत्तम पर्याय असू शकतो.
11 / 11
हॉल्टर नेकलाईन पॅटर्नचे ब्लाऊज आपल्याला अधिक जास्त बोल्ड लूक देतो. आपण साडी किंवा लेहेंगा अशा दोन्ही प्रकारच्या आऊटफिट्सवर या नेकलाईन पॅटर्नचे ब्लाऊज पेअर करु शकता. हॉल्टर नेकलाईन पॅटर्नच्या ब्लाऊजची निवड करु शकता.
टॅग्स : फॅशनस्टायलिंग टिप्स