ट्रॅडिशनल लूक देणारी स्टायलिश बुगडी घ्यायची? बघा लेटेस्ट फॅशनच्या ८ सुपरवॉव बुगडी डिझाईन्स...
Updated:February 28, 2024 17:48 IST2024-02-28T17:41:41+5:302024-02-28T17:48:27+5:30

हल्ली बुगडीची फॅशन खूप इन आहे. त्यामुळे कोणत्याही लहान मोठ्या कार्यक्रमांसाठी तयार झालं की हल्ली बऱ्याच जणी हौशेने बुगडी घालतातच.
तुम्हालाही लग्नसराईच्या निमित्ताने लेटेस्ट फॅशनची बुगडी घ्यायची असेल तर हे काही आकर्षक बुगडी डिझाईन्स एकदा पाहून घ्या...
मोरांचं सुंदर नाजूक डिझाईन असणारी ही बुगडी ट्रॅडिशनल आणि ट्रेण्डी अशा दोन्ही प्रकारात जाते.
बुगडी आणि कानातल्यांचा हा एक आकर्षक सेट बघा.. असं घालून जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेलात तर तिथे नक्कीच तुमचे हे कानातले आणि बुगड्या आकर्षणाचा विषय ठरतील.
ही बुगडी ट्रॅडिशनल आणि ट्रेण्डी अशा दोन्ही प्रकारात जाते.
चांदी आणि मोत्यांची ही सुंदर बुगडी बघा... ऑक्सिडाईज दागिने असतील तर अशी बुगडी छान वाटेल.
ऑक्सिडाईज प्रकारातली थोडी ट्रेण्डी बुगडी पाहिजे असेल तर हे डिझाईन तुम्हाला आवडू शकतं.
एकदम ट्रॅडिशनल मराठी लूक करायचा असेल आणि त्यावर हेवी डिझाईनची बुगडी पाहिजे असेल तर ही बुगडी छान आहे.
ट्रॅडिशनल लूक देणारं हे डिझाईनही छान आहे.