Join us   

कंगना रे.. हातात घाला सुंदर कंगन! पाहा १० नवीन डिजाईन्स, सण समारंभात हातांची वाढेल शोभा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2024 4:18 PM

1 / 13
सणवार म्हटलं की सगळ्याच स्त्रिया अगदी नटून - थटून तयार होतात. एरवी नाही पण सणावाराला बऱ्याचशा स्त्रिया हातात आवडीने बांगड्या घालतात. बांगड्यांसोबतच हातात वेगवेगळ्या प्रकारचे कंगन देखील घातले जातात. बांगड्यांच्या सेटच्यामध्ये वेगवेगळ्या डिजाईन्सचे मोठे आणि थोडे हेव्ही असे कंगन घातले जातात. हे कंगन हातांचे सौंदर्य अधिक खुलवून देण्यास मदत करतात. विविध रंगांच्या बांगड्या किंवा अगदी हिरव्या चुड्या सोबतही आपण हे हटके नव्या डिजाईन्सचे कंगन घालू शकता( Kangan for women latest design).
2 / 13
बांगड्यांच्या सेट सोबत आपण असे नाजूक फुलांच्या डिजाईनचे कंगन घालू शकता. नाजूक फुलांचे डिजाईन असलेले हे कंगन बांगड्याच्या सेटमध्ये अगदी शोभून दिसतील.
3 / 13
आपण हातात नाजुकसे स्टोन वर्क असणारे कंगन देखील घालू शकता. या कंगनमध्ये असणारे बारीक चकाकणारे स्टोन आणि बारीक नाजूक नक्षीकाम खूपच सुरेख दिसते.
4 / 13
आपण अशा प्रकारे मोत्यांचे डिजाईन असलेले कंगन देखील घालू शकता. खास करून हिरव्या चुड्यामध्ये असे मोत्यांचे कंगन अतिशय उठून दिसतील.
5 / 13
असे मोराचे डिजाईन असणारे कंगन बांगड्यांच्या सेटसोबत किंवा जर आपल्याला बांगड्या घालायच्या नसतील तर फक्त हे कंगन देखील हातात घालू शकता.
6 / 13
कंगनला खालच्या बाजूने झुमके देखील लावलेले असतात, असे कंगन अधिकच खुलून दिसतात. जर आपल्याला खूप हेव्ही लूक हवा असेल तर आपण हातात असे झुमके असणारे कंगन देखील घालू शकतो.
7 / 13
सुंदर, नाजूक कुंदन वर्क असणारे कंगन देखील आपल्या हाताला एक वेगळाच क्लासी लूक देतील.
8 / 13
जर आपण हातात हिरवा चुडा घालणार असाल तर या हिरव्या चुड्यामध्ये आपण मध्ये किंवा चुड्याच्या सुरुवातीला आणि शेवटी असे गोल्डन प्लेटेड हेव्ही डिजाईन असणारे कंगन घालू शकतो.
9 / 13
जर आपल्याला हातात बांगड्या घालायच्या नसतील तर आपण दोन हातात असे दोन मोठे कंगन घालू शकतो. असे हेव्ही कंगन घातल्याने आपला हात रिकामी न वाटता छान आकर्षक दिसण्यास अधिक मदत होईल.
10 / 13
आपण हातात असे वेगवेगळ्या आकारांचे देखील कंगन घालू शकता. प्रत्येकवेळी गोल कंगन घालण्यापेक्षा आपण असे चौकोनी आकारातील कंगन घालून काहीतरी वेगळी अशी हटके फॅशन करु शकता.
11 / 13
जर आपल्याला फार हेव्ही किंवा पारंपरिक पद्धतीचे कंगन घालायचे नसतील तर आपण अशा नाजूक डिजाईनचे थोडे मॉर्डन पद्धतीचे कंगन घालू शकता.
12 / 13
कंगन म्हटलं की त्यात थोडे हेव्ही आणि असे देवदेवतांचे डिजाईन असलेले कंगन देखील हाताला अधिक जास्त शोभून दिसतील.
13 / 13
कंगनमध्ये हत्ती, मोर अशा प्राण्यांचे डिजाईन असलेले कंगन देखील हातात अधिक उठून दिसतात.
टॅग्स : फॅशनस्टायलिंग टिप्सखरेदी