Latest pattern mangalsutra design for wedding season, stylish trendy heavy long mangalsutra designs
लग्नकार्यात घालायला छान ठसठशीत मंगळसूत्र घ्यायचंय? बघा लेटेस्ट फॅशनचे ८ सुंदर डिझाईन्सPublished:March 2, 2024 09:12 AM2024-03-02T09:12:26+5:302024-03-02T09:15:02+5:30Join usJoin usNext एरवी बऱ्याचजणी गळ्यात नाजूक मंगळसूत्र घालतात. किंवा बऱ्याच जणी घालतही नाहीत. पण लग्नकार्यात किंवा एखादा समारंभ असेल तर मात्र साडी नेसल्यावर गळ्यात एखादं ठसठशीत मंगळसूत्र पाहिजेच. म्हणूनच लग्नसराईच्या निमित्ताने तुम्हाला लांब, घनसर अशा मंगळसूत्राची खरेदी करायची असेल तर हे काही पर्याय एकदा बघा. यातले डिझाईन्स अगदी लेटेस्ट फॅशनचे स्टायलिश आहेत. हे बघा एक सुंदर स्टायलिश डिझाईन. एखाद्या डिझायनर साडीवर हे मंगळसूत्र घालायला छान आहे. हे मंगळसूत्रही अगदी नव्या फॅशनचं आहे. कारण त्याची मणी ओवण्याची पद्धत अतिशय वेगळी असून बघताक्षणीच ते लक्ष वेधून घेतं. असं हेवी पेंडंट असणारं एकच मंगळसूत्र गळ्यात घातलं तरी खूप छान वाटेल. इतर कोणत्या दागिन्याची गरजच नाही. हे एक थोडं वेगळं डिझाईन पाहा. यामध्ये पारंपरिक वाट्या किंवा पेंडंटऐवजी छोटासा चंद्र आणि चांदण्यांचं नाजूक डिझाईन देण्यात आलं आहे. या मंगळसूत्राचं पेंडंट बघा. अतिशय युनिक डिझाईन आहे. दोन्ही बाजूला दाेन हत्ती आणि मध्यभागी झुमका असं डिझाईन नक्कीच चारचौघीत उठून दिसणारं आहे. हेवी पेंडंट असणारं हे आणखी एक डिझाईन् तुम्हाला आवडू शकतं. टॅग्स :फॅशनब्यूटी टिप्सलग्नदागिनेfashionBeauty Tipsmarriagejewellery