दिवाळीत करा स्वत:ची हौस, घ्या नाजूक-सुंदर चांदीचे पैंजण! पाहा लेटेस्ट फॅशनचे ८ मोहक डिझाइन्स By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2023 5:29 PM 1 / 8दिवाळीत पायात घालायला चांदीचे सुंदर पैंजण घ्यायचे असतील, तर हे लेटेस्ट फॅशनचे काही पर्याय पाहा.. एकापेक्षा एक छान डिझाईन्स मन आकर्षून घेतात.2 / 8हे एक एकदम लेटेस्ट डिझाईन. लहान मुलांच्या पायात घालायला वाळा असतो, तसेच हे डिझाईन असून त्याला एका बाजुने नाजूकसे घुंगरू आहे.3 / 8याच प्रकारातलं हे आणखी एक ठसठशीत डिझाईन. हा दागिना पायात घालताच पाय कसा भरून दिसतो.4 / 8मीना काम केलेलं हे एक सुंदर नाजूक डिझाईन. कोणत्याही पारंपरिक पेहेरावावर शोभून दिसेल असंच आहे.5 / 8क्रिस्टल्स किंवा बारीक स्टोन लावलेले पैंजणही आजकाल अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. त्यापैकी काही घ्यायचं असेल तर हे डिझाईन पाहा.6 / 8एकदम हेवी पैंजणांची आवड असेल तर हे मोराचं डिझाईन खूप सुंदर आहे. असं एखादं पीस आपल्या कलेक्शनमध्ये ठेवायला हरकत नाही.7 / 8जोडवी आणि पायातलं असं हे एकत्रित असलेलं डिझाईन पाहा. यातही अनेक प्रकार उपलब्ध आहेत. 8 / 8छोटंसं सुंदर फूल, त्याला साखळ्या आणि नाजूकसं घुंगरू.... हे डिझाईनही पायात घातल्यावर खूप छान उठून दिसतं. आणखी वाचा Subscribe to Notifications