ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याचे ६ लेटेस्ट पॅटर्न, सुंदर-देखण्या डिझाईन्स, दिसा स्टायलिश आणि एलिगण्ट
Updated:January 5, 2024 18:12 IST2024-01-05T12:22:25+5:302024-01-05T18:12:48+5:30

ब्लाऊजचा मागचा गळा कसा शिवायचा, याचे बरेच पॅटर्न आपल्याला माहिती असतात. पण समोरच्या बाजुने मात्र गळा कसा घ्यावा हे कळत नाही.
त्यामुळे मग सर्वसाधारणपणे बहुतांश जणी समोरचा गळा गोल किंवा चौकोनी घेतात. पण आता हे दोन्ही प्रकार खूप जुने झाले असून समोरच्या गळ्याचे अनेक लेटेस्ट पॅटर्न सध्या ट्रेण्डमध्ये आहेत.
म्हणूनच आता जर ब्लाऊज शिवणार असाल तर पुढे सांगितल्यापैकी काही वेगळे डिझाईन्स ट्राय करा. समोरच्या बाजुने गळ्याचा आकार बदलला की बघा तुमचा सगळाच लूक कसा बदलून जातो... हे ब्लाऊज तुम्ही साडी तसेच लेहेंग्यावर घालू शकता.
सध्या हो कोरसेट ब्लाऊज (corset blouse) खूप ट्रेण्डमध्ये आहे. या डिझाईनमध्ये नुसता बेल्टच आहे. पण तुम्ही त्याऐवजी तुमच्या नेहमीच्या पद्धतीने शोल्डर आणि बाह्या घेऊ शकता.
व्ही नेकलाईन (V neckline blouse) असणारं ब्लाऊजही हल्ली खूप जणी शिवतात. भरगच्च डिझाईन असणारी साडी आणि प्लेन ब्लाऊज असा पॅटर्न असेल तर हे डिझाईन छान दिसतं.
यातलं दुसरं आहे कर्व्ह व्ही नेक ब्लाऊज (curved V neckline blouse). यामध्ये डिप व्ही नेक ऐवजी कर्व्ह घेतला गेला आहे.
स्क्वेअर नेक (square neck) या प्रकारातलाच हा लेटेस्ट पॅटर्न बघा. तरुणींना अशा पद्धतीचे ब्लाऊज छान दिसते.
अशा पद्धतीच्या स्वीटहार्ट नेक (sweatheart neck) ब्लाऊजची सध्या खूप फॅशन आहे.
स्वीटहार्ट नेक आणि त्याला फुग्यांच्या बाह्या असा लूकही तुम्ही डिझायनर साडीवर किंवा लेहेंग्यावर करू शकता.