अशी पर्स सुरेख बाई! पाहा पर्सचे सुंदर प्रकार, तुमच्या हातातली पर्स पाहून इतरजणींना वाटेल जेलस!
Updated:April 15, 2025 18:45 IST2025-04-15T18:38:56+5:302025-04-15T18:45:12+5:30
Look at the beautiful types of purses : सध्या बाजारात ट्रेंडींग आहेत या मस्त स्टाईलिश पर्स. तुम्हाला कोणती आवडेल?

रोजच्या वापराच्या वस्तूंपैकी एक म्हणजे पर्स. सामान व्यवस्थित राहील आणि दिसायलाही छान दिसेल अशा पर्सेचे कलेक्शन करायची आवड महिलांना असते. पर्स ही अत्यंत गरजेची वस्तू आहे.
सध्या बाजारामध्ये विविध प्रकारच्या पर्स उपलब्ध आहेत. मात्र आजकाल फक्त शोच्या पर्स जास्त मिळतात. त्यांचा उपयोग काही नाही. अशा पर्स न घेता दिसतीलही छान आणि फायद्याच्याही ठरतील अशा पर्स घ्या. पाहा मस्त पॅटर्न.
फ्लोरल हा प्रकार सध्या फार लोकप्रिय आहे. अगदी सिंपल वर्क मध्ये छान लुक देणारा हा पॅटर्न रोजच्या वापरासाठी अगदी मस्त आहे.
नवीन काही तरी ट्रेंडींग व वेगळे वापरायचे असेल तर मग ही क्रॉशेट बॅग खास तुमच्यासाठीच आहे. आजकाल सगळ्या शहरांमध्ये आरामात उपलब्ध होते.
तरुणींमध्ये तसेच तरुण मुलांमध्येही क्रेज आहे ती या तोट बॅगची. ही बॅग वापरायला अगदी कम्फर्टेबल आहे तसेच दिसायलाही फार छान आहे.
होलोग्राफीक पर्स आजकाल फार लोकप्रिय आहेत. विविध प्रकारच्या रंगांचे मिश्रण आणि चमक असणारी ही पर्स पार्टीसाठी अगदी परफेक्ट आहे.
क्रॉसबॉडी पर्स या पॅटर्नला आपण साईड पर्स असेही म्हणतो. हा प्रकार प्रवास किंवा फिरायला जाताना फार फायदेशीर ठरतो.
शोल्डर बॅगवर मस्त काही चित्र असेल तर ती फार छान दिसते. कापड कॉटनचे असेल तर वापरायलाही सोपी जाते आणि धुताही येते. रोजच्या वापरासाठी हा पॅटर्न मस्त आहे.
लहान आरसे वापरून तयार केलेली बंजारा बॅग भारतीय पेहरावावर अगदी सुट करते. त्यामध्ये सामान ठेवायला जागाही बरीच असते.
काश्मीरी बॅग हा प्रकार फार जुना आहे. सध्या त्याची विक्री भारतभरात वाढली आहे. अगदी सुंदर असा हा प्रकार नक्की वापरुन बघा.