1 / 9भारतीय पेहराव फार सुंदर दिसतात. काही सण असले किंवा कार्यक्रम असले की आपण विविध प्रकारचे ड्रेस वापरतो. त्यापैकीच एक प्रकार म्हणजे लेहेंगा. प्रत्येक महिलेवर लेहेंगा सुंदरच दिसतो. 2 / 9त्यामध्ये विविध प्रकारही असतात तसेच रंग तर भरपूर असतात. माधुरी ते आलिया कोणाचा लेहेंगा तुम्हाला आवडतो ते पाहा. त्यानुसार येत्या सणांसाठी नक्की शिऊन घ्या. किंवा विकत आणा. 3 / 9आलिया भटने घातलेला हा लेहेंगा अगदी साधा आणि छान आहे. दोन फेंट रंगांचे कॉम्बिनेशन फारच सुंदर वाटते. तसेच पिवळा व आकाशी फार कॉमन असे कॉम्बिनेशन नाही. पण दिसायला सुंदरच दिसते.4 / 9कियारा अडवाणीचे लेहेंगा कलेक्शन फार सुंदर आहे. त्यापैकीच एक म्हणजे हा पांढरा लेहेंगा. त्यावर छान पिवळी ओढणी. हा पॅटर्न जरा हटके आहे. संगीतसाठी अगदीच मस्त.5 / 9माधुरी दीक्षित कायमच सुंदर दिसते. तिचे कपडे अगदी अंग झाकलेले असतात तरी ती हॉट दिसते. माधुरीचा हा हिरवा लेहेंगा अगदीच कमाल आहे. 6 / 9दिपिकाने घातलेला हा जरीचा लेहेंगा अगदी सुंदर आहे. असा लेहेंगा शिऊन घेणे कोणालाही नक्कीच शक्य आहे इतका तो साधा आहे तरीही प्रचंड सुंदर दिसतो. 7 / 9श्रीदेवीचा हा गुलाबी लेहेंगा नक्कीच कोणी विसलेले नाही. तिचे फोटो फार व्हायरल झाले होते. आणि लोकांना तिचा पेहराव प्रचंड आवडला होता.8 / 9मलायका अरोराचा हा लूक फारच सुंदर आणि मनमोहक आहे. तिने घातलेला लेहेंगा कमाल आहे. रंगही जरा वेगळा आहे. 9 / 9माधुरीचा हा हटके लेहेंगा जेवढा साधा आहे तेवढाच सुंदर. लग्न कार्यासाठी अगदीच मस्त दिसेल.