Makar Sankranti : काळ्या साडीवर मॅचिंग ब्लाऊज शिवलं नाही? ‘या’ ५ रंगाचे ब्लाऊज घाला, स्टायलिश दिसाल..
Updated:January 8, 2025 17:02 IST2025-01-08T13:52:59+5:302025-01-08T17:02:13+5:30

बऱ्याचदा असं होतं की मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण काळ्या रंगाची साडी मोठ्या हौशीने घेतो. पण त्यावरचं ब्लाऊज मात्र वेळेत शिवून येत नाही आणि मग आपला पार हिरमोड होतो.
असं यावर्षीही झालं तर अजिबात नाराज होऊ नका. त्याऐवजी तुमच्या साडीवर पुढील काही कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाऊज ट्राय करून पाहा. साडी खूप उठून दिसेल..
काळं आणि गुलाबी हे कॉम्बिनेशन ऑलवेज हिट आहे. त्यामुळे अगदी बिंधास्त काळ्या साडीवर गुलाबी ब्लाऊज घाला. मस्त दिसाल.
काळं आणि लाल किंवा काळं आणि मरून हे कॉम्बिनेशनही खूप कॅची दिसतं. सध्या थंडी आहेच. त्यामुळे लाल किंवा मरून रंगाचं असं लांब बाह्याचं ब्लाऊज असलं तरी काळ्या साडीवर छान वाटेल.
जर तुमच्या काळ्या साडीवर अशा पद्धतीचं खूप जास्त गोल्डन वर्क असेल तर त्यावर पिवळ्या रंगाचं किंवा सोनेरी रंगाचं ब्लाऊज ट्राय करून पाहा.
प्लेन काळ्या साडीवर वर्क असणारं किंवा नाजूक बुटी असणारं केशरी रंगाचं ब्लाऊजही खूप छान दिसतं.
प्लेन काळ्या साडीवर किंवा खूपच कमी बुटी असणाऱ्या नाजूक बॉर्डरच्या काळ्या साडीवर तुम्ही असं एखादं मल्टीकलर प्रिंटेड ब्लाऊजही घालू शकता.