मकर संक्रांत स्पेशल : काळी साडी आणि पंजाबी ड्रेसवर सुंदर दिसणाऱ्या दागिन्यांचे ५ पर्याय By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2024 6:54 PM 1 / 8मकर संक्रांत म्हटली की काळे कपडे ओघानेच आले. या काळ्या कपड्यांवर कोणत्या प्रकारचे दागिने खुलून येतील असा प्रश्न आपल्याला पडतो (Makar Sankranti Jewellery Options on black cloths).2 / 8काळे कपडे उठून दिसावेत यासाठी त्यावर कमी आणि थोडे लहान आकाराचे सोबर दागिने घालायला हवेत.3 / 8मोती हा कोणत्याही कपड्यांवर जाणारा ज्वेलरीतील उत्तम प्रकार असून काळ्या कपड्यांवर तर मोकी फारच छान दिसतो. 4 / 8इमिटेशन ज्वेलरीत कुंदनचा वापर केलेला असल्याने अशी ज्वेलरीही काळ्या कपड्यांवर छान दिसते. 5 / 8ऑक्सिडाईज म्हणजेच काळपट सिल्व्हर रंगातील दागिने काळी साडी किंवा पंजाबी ड्रेसवर मस्त खुलून येतात. 6 / 8पारंपरिक खड्याचे दागिनेही काळ्या कपड्यांवर अतिशय छान दिसतात, त्यामुळे या दागिन्यांचाही तुम्ही नक्कीच विचार करु शकता. 7 / 8संक्रांत म्हणजे तिळगूळ हे समीकरण असल्याने साखरफुटाण्यांपासून केलेले वेगवेगळ्या आकाराचे आणि डिझाईन्सचे दागिने नव्याने लग्न झालेल्या विवाहित महिला आणि लहान मुलांना आवर्जून घातले जातात. 8 / 8पारंपरिक दागिन्यांपेक्षा थोडा वेगळा आणि हटके लूक करायचा असेल तर असे फॅन्सी प्रकारातील दागिने नक्की घालू शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications