आलिया भटच्या पायातले नाजूक देखणे म्यूल शूज पाहिले? पाहा म्यूल शूजची दुनिया, पायांची वाढवतात शोभा By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2022 3:44 PM 1 / 10१. आलिया भटचा तिच्या लग्नानंतर व्हायरल झालेला हा पहिला फोटो. या फोटोमध्ये तिच्या ड्रेसने, तिच्या स्टाईलने लक्ष वेधून घेतलेच होते. पण त्यापेक्षाही सगळ्यात कॅची ठरले ते तिचे म्युल फुट वेअर. (mules footwear for women)2 / 10२. पादत्राणांच्या या प्रकाराला म्यूल म्हणून ओळखले जाते. चपल, सॅण्डल, शूज असे सगळेच प्रकार वापरून कंटाळा आला असेल तर म्यूल प्रकार वापरून बघायला हरकत नाही.3 / 10३. या प्रकारात समोरच्या बाजूने तुमचा पाय बुट घातल्यासारखा वाटतो. तर मागच्या बाजूने तुम्ही चप्पल घातली आहे, असा फिल येतो. पुढचा भाग निमुळता असणे ही म्युलची खासियत. 4 / 10४. बुट घातल्याने पायाला खूप फिट होत असेल आणि सॅण्डल घातल्याने जरा जास्तच सैलसर वाटत असेल तर म्युल हा त्या दोघांच्या बरोबर मधला फुटवेअर प्रकार तुम्हाला नक्कीच आवडू शकतो.5 / 10५. उन्हाळ्यात लग्नसराईसाठी तर हा प्रकार हमखास चालतो. कारण मोती, कुंदन, सोनेरी धागे, सिक्विन अशा विविध प्रकारांनी ते सजवलेले असतात. खास नवरीसाठी खरेदी करणार असाल तर तिच्या लेहेंग्यावर किंवा साडीवर मॅचिंग होणारे अनेक हेवी डिझाईन्सचे म्यूल्स ऑनलाईन तर उपलब्ध आहेतच, पण लोकल मार्केटमध्येही मिळतील.6 / 10६. म्युल हा प्रकार काही काल परवाचा नाही. १७ व्या शतकातही त्यांचा उल्लेख आढळतो. त्या काळी स्त्री आणि पुरुष दोघेही म्युल वापरायचे. 7 / 10७. युरोपमध्ये तर १६ व्या शतकात म्यूल घातले जायचे, असा उल्लेख आहे. त्याकाळी ते फक्त घरगुती वापरासाठी असायचे. bedroom slippers अशी ओळख असणारे म्युल सार्वजनिक ठिकाणी घालणे टाळले जायचे.8 / 10८. १८ व्या शतकात म्युलची लोकप्रियता कमी झाली. कारण त्यांचा वापर प्रोस्टीट्यूट्सकडून होऊ लागला. त्यामुळे सर्वसामान्यांनी म्युलचा वापर जवळपास बंद केला.9 / 10९. त्यानंतर मात्र पुन्हा १९ व्या शतकात म्युल्सची फॅशन जोर धरू लागली. बेडरूम स्लिपर्स म्हणून ओळखले जाणारे म्युल्स मग हळूहळू सार्वजनिक ठिकाणीही घातले जाऊ लागले. 10 / 10१०. आता तर फाॅर्मल आणि एथनिक या दोन्ही प्रकारात म्यूल मिळतात आणि एखाद्या समारंभापासून ते ऑफिसपर्यंत अनेक ठिकाणी ते घातले जातात. आणखी वाचा Subscribe to Notifications