लग्नात भरजरी लेहेंग्यावर शोभून दिसणाऱ्या नोज रिंग्जचे नवे पॅटर्न, नथीपासून नथनीपर्यंत स्टायलिश फॅशन...

Published:December 4, 2024 02:57 PM2024-12-04T14:57:43+5:302024-12-04T15:18:29+5:30

Nath Style With Wedding Lehenga For Simple Look : 6 Simple Nath Designs For The Minimalistic Brides : 6 Bridal Nath Designs For The Traditional Indian Bride : भरजरी-हेव्ही वर्क लेहेंग्यावर घालता येतील अशा नोज रिंग...

लग्नात भरजरी लेहेंग्यावर शोभून दिसणाऱ्या नोज रिंग्जचे नवे पॅटर्न, नथीपासून नथनीपर्यंत स्टायलिश फॅशन...

डिसेंबर महिना म्हटलं की लग्नाचा सिझन असतो. या लग्नाच्या सिझनमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे आऊटफिट्स घालतो. या आऊटफिट्समध्ये, सुंदर, नाजूक नक्षीकाम केलेला भरीव लेहेंगा असतोच. लेहेंगा घातल्यावर आपण त्यावर शोभून दिसेल असे दागिने देखील मोठ्या आवडीने घालतो. या हेव्ही वर्क असणाऱ्या भरजरी लेहेंग्यावर नाकांत नोज रिंग (6 Bridal Nath Designs For The Traditional Indian Bride) अतिशय शोभून दिसतेच. नाकात छानशी नोज रिंग घातल्याशिवाय या लेहेंग्याचा संपूर्ण लूक पूर्ण होतंच नाही. यासाठीच यंदाच्या लग्नसराईत जर तुम्ही देखील भरजरी, हेव्ही वर्क असणारा लेहेंगा घालणार असाल तर त्यावर शोभून दिसणाऱ्या या नोज रिंग पॅटर्न्स नक्की ट्राय कराच.

लग्नात भरजरी लेहेंग्यावर शोभून दिसणाऱ्या नोज रिंग्जचे नवे पॅटर्न, नथीपासून नथनीपर्यंत स्टायलिश फॅशन...

भरीव किंवा हेव्ही वर्क असणाऱ्या लेहेंग्यावर आपण स्टोनची नोज रिंग घालू शकता. पांढऱ्या पारदर्शक किंवा रंगीबेरंगी वेगवेगळ्या स्टोनच्या नोज रिंग आपण वापरु शकता. जर आपल्याला वजनाने जास्त जड नोज रिंग नको असेल तर आपण अशी सिम्पल नोज रिंग लेहेंग्यावर घालू शकता.

लग्नात भरजरी लेहेंग्यावर शोभून दिसणाऱ्या नोज रिंग्जचे नवे पॅटर्न, नथीपासून नथनीपर्यंत स्टायलिश फॅशन...

लेहेंग्यावर आपण स्टोन प्रमाणेच मोत्यांची नोज रिंग देखील घालू शकता. जर तुमच्या लेहेंग्यावर मोत्यांचे हेव्ही वर्क असेल तर अशी मोत्यांची नोज रिंग तुम्हाला अधिक जास्त शोभून दिसेल. या नोज रिंग सोबत येणारी नाजूक मोत्यांची माळ देखील तुमचा लूक अधिक खुलवते.

लग्नात भरजरी लेहेंग्यावर शोभून दिसणाऱ्या नोज रिंग्जचे नवे पॅटर्न, नथीपासून नथनीपर्यंत स्टायलिश फॅशन...

जर आपल्या लेहेंग्यावर डायमंड्सचे हेव्ही वर्क असेल तर ही डायमंड नोज रिंग तुम्हाला अधिक जास्त शोभून दिसेल.

लग्नात भरजरी लेहेंग्यावर शोभून दिसणाऱ्या नोज रिंग्जचे नवे पॅटर्न, नथीपासून नथनीपर्यंत स्टायलिश फॅशन...

आपण फ्लॉवर डिज़ाईन्सची देखील नोज रिंग घालू शकता. यात तुमच्या नाकात घातल्या जाणाऱ्या मोठ्या रिंगमध्ये छोटे फुलाच्या आकाराचे डिजाईन असते, हे सुंदर, नाजूक फ्लॉवर डिजाईन तुमच्या वेडिंग लूकमध्ये चार चांद लावून जाईल.

लग्नात भरजरी लेहेंग्यावर शोभून दिसणाऱ्या नोज रिंग्जचे नवे पॅटर्न, नथीपासून नथनीपर्यंत स्टायलिश फॅशन...

भरीव नोज रिंग डिजाईन या पॅटर्नमध्ये नाकात घातल्या जाणाऱ्या गोलाकार नोज रिंगच्या आत आणि बाहेर अशा दोन्ही बाजूला भरीव अशा वेगवेगळ्या प्रकारचे डिझाइन्स असतात. जर तुमचा लेहेंगा प्लेन असेल किंवा थोडेच वर्क केलेले असेल तर आपला लूक अधिक उठावदार करण्यासाठी आपण अशा प्रकारच्या भरीव नोज रिंग घालू शकता.

लग्नात भरजरी लेहेंग्यावर शोभून दिसणाऱ्या नोज रिंग्जचे नवे पॅटर्न, नथीपासून नथनीपर्यंत स्टायलिश फॅशन...

डायमंड, स्टोन प्रमाणेच आपण कुंदन डिजाईन्सच्या देखील नोज रिंग घालू शकतो. या नोज रिंगच्या गोलाकार कडेवर केले जाणारे नाजूक कुंदन डिझाइन्स अधिक सुंदर दिसते.

लग्नात भरजरी लेहेंग्यावर शोभून दिसणाऱ्या नोज रिंग्जचे नवे पॅटर्न, नथीपासून नथनीपर्यंत स्टायलिश फॅशन...

जर आपल्याला मोठी किंवा खूप जास्त हेव्ही वर्क असणारी तसेच नोज रिंगसोबत असणारी माळ नको असल्यास आपण अशा प्रकारची छोटी नाजूक नोज रिंग देखील नाकात घालू शकता.