Join us   

गरबा खेळताना घाला ट्रॅडिशनल पण हटके ‘असे’ स्टायलिश शूज, पायही दुखणारही नाहीत आणि दिसालही ट्रेंडी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2024 9:13 PM

1 / 9
नवरात्रीत गरबा खेळायला जाताना सगळेच नटून - थटून जातात. विशेष करून स्त्रिया मोठमोठाले घेरदार घागरे, चोली, कानात झुमके, बिंदिया, पैंजण अशी सगळी जय्यत तयारी करुन जातात. पण संपूर्ण तयारी झाल्यानंतर सगळ्यात शेवटी पायात काय घालायचं असा प्रश्न पडतो. शक्यतो, घागरा - चोली घातल्यावर आपण पायात रंगीबेरंगी वर्क असणारी मोजडी किंवा हिल्स घालतो. खरंतर, पायांत चपला घालूंन गरबा खेळण्यासाठी आपण आपल्याला कम्फर्टेबल वाटेल अशाच चपला घालतो. परंतु बदलत्या काळानुसार, ट्रेंड देखील बदलत असतात. त्यामुळे आता घागरा - चोलीवर चक्क स्नीकर्स शूज देखील घातले जातात. याच स्नीकर्स शूजना हटके लुक्स देण्यासाठी त्यावर वर्क देखील केले जाते. असे वेगवेगळ्या डिझाइन्स आणि पॅटर्न्स असणारे स्नीकर्स शूज सध्या ट्रेंडमध्ये आहेत. हे ट्रेंडी शूज घातल्याने गरबा खेळून पायही दुखत नाही आणि ते घागरा - चोलीवर परफेक्ट मॅचिंग होतात(Navratri special sneakers shoes for ladies).
2 / 9
१. आपण अशाप्रकारचे रंगीबेरंगी धागा आणि मिरर वर्क असणारे स्नीकर्स शूज घालू शकता.
3 / 9
२. जर तुमच्या घागरा - चोलीवर गोल्डन बिड्सचे असे वर्क पॅटर्न असेल तर आपण त्यावर मॅचिंग असे गोल्डन वर्क केलेल्या शूजची निवड करु शकता.
4 / 9
३. स्नीकर्स शूज मध्ये अनेक वेगवेगळ्या रंगांचे, डिझाईन्सचे शूज आपल्याला बाजारांत अगदी सहज विकत मिळतील. आपल्या घागरा - चोलीवर असणाऱ्या वर्क प्रमाणे आपण स्नीकर्स शूज खरेदी करु शकतो.
5 / 9
४. घागऱ्यावर असणाऱ्या ट्रॅडिशनल गोटा पट्टी वर्कला मॅचिंग असणारे असे स्नीकर्स शूज निवडू शकता.
6 / 9
५. आपण अशाप्रकारे अगदी बारीक छोट्या मण्यांचे वर्क असणारे स्नीकर्स शूज घालू शकता.
7 / 9
६. या स्नीकर्स शूजमध्ये काही पेस्टल शेड्स देखील विकत मिळतात. आपल्या घागरा - चोली जर पेस्टल शेडचे असे आणि त्यावर मोती वर्कचे डिझाईन असेल तर आपण अशा प्रकारचे मोती वर्क असणारे शूज घालू शकता.
8 / 9
७. शूजलेसच्या जागी अशाप्रकारे लटकन लावलेले शूज देखील तुमच्या गरबा लुक्सला हटके टच देतील.
9 / 9
८. जर आपल्याला जास्त हेव्ही वर्क किंवा डिझाईन्स केलेले शूज नको असतील तर आपण असे शूजच्या फक्त पुढच्या भागावर हलके वर्क केलेले स्नीकर्स शूज घालू शकता.
टॅग्स : शारदीय नवरात्रोत्सव २०२४फॅशननवरात्रीगरबानवरात्री गरबा २०२४