1 / 10नवरात्रोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे तरुणाईची, महिला मंडळांची आपापली लगबग सुरू झाली आहे. नवरात्रीचं मुख्य आकर्षण असतं ते नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ रंग... म्हणूनच तर यावर्षी नवरात्रीच्या कोणत्या माळेचा कोणता रंग आहे ते एकदा पाहा आणि त्यानुसार वेगवेगळ्या कपड्यांच्या तयारीला लागा...2 / 10घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच ३ ऑक्टोबरला नवरात्रीच्या पहिल्या माळेचा रंग आहे पिवळा.3 / 10दुसऱ्या दिवशी म्हणजेच ४ तारखेच्या दुसऱ्या माळेचा रंग आहे संपन्नतेचं प्रतिक असणारा हिरवा रंग.4 / 10५ ऑक्टोबररोजी तिसऱ्या माळेला घालण्यासाठी तुम्ही ग्रे किंवा करड्या रंगाचे कपडे तयार ठेवा...5 / 10यावर्षी नवरात्रीच्या चौथ्या माळेचा रंग आहे नारंगी. 6 / 10 सोमवारी म्हणजेच ७ ऑक्टोबर रोजी ललिता पंचमीच्या दिवशीचा रंग आहे पांढरा....7 / 10पांढऱ्या रंगानंतर सहाव्या माळेचा रंग आहे लाल... लाल रंग म्हणजे उर्जा, तेज यांचं प्रतिक8 / 10९ ऑक्टोबररोजी नवरात्रीच्या सातव्या माळेला घालण्यासाठी रॉयल ब्लू रंगाचे कपडे तयार ठेवा.9 / 10अष्टमी हा नवरात्रीतील एक अतिशय महत्त्वाचा दिवस. या दिवशीचा रंग आहे गुलाबी.10 / 10नवमी आणि दसरा यावर्षी एकाच दिवशी आहे. त्यामुळे नवरात्रीच्या शेवटच्या दिवसाचा म्हणजेच ११ ऑक्टोबरचा रंग आहे जांभळा..