1 / 8आपल्या कपड्यांच्या योग्यतेनुसार विविध पॅटनचा ब्रा आपल्याला पाहायला मिळतात. अगदी टी-शर्ट, ड्रेस, ब्लाऊज, कुर्ती यामध्ये कोणत्या प्रकारची ब्रा घालायची हे आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असेलच. परंतु, ब्रा धुताना आपली गडबड होते. (Bra washing tips)2 / 8बऱ्याच स्त्रिया ब्रा खराब होऊ नये म्हणून ती धुत नाही. असे करणे खरेतर चांगले नाही. अनेकजण वेळ वाचवण्यासाठी ब्रा वॉशिंग मशिनमध्ये धुतात पण असे केल्यामुळे ब्रा खराब होते. आपले पैसे देखील वाया जातात. (Why you should never wash bras in a washing machine)3 / 8ब्रा खरेदी करताना आपण ती २ ते ३ महिने टिकेल या हिशोबाने खरेदी करतो परंतु, वॉशिंग मशिनमध्ये धुतल्यामुळे ती खराब होते. अशावेळी आपण कोणत्या चुका टाळायला हव्यात हे पाहूया. 4 / 8ब्रा चा सर्वात महत्त्वाचा भाग त्याच्या आतील इलास्टिक आणि स्ट्रिप्स. ब्रा वॉशिंग मशिनमध्ये धुतल्यामुळे त्याचे इलास्टिक खराब होते ज्यामुळे स्ट्रीप्स देखील लूज होतात. यामुळे त्याची फिटिंग खराब होते. 5 / 8आपण अंडरवायर ब्रा वापरत असू तर चुकूनही मशिनमध्ये धुवू नका. यामुळे वायर खराब होते. मशिनमध्ये स्पिन झाल्यानंतर अंडरवायर वाकतो किंवा तुटतो. ज्यामुळे पुन्हा ब्रा वापरणे कठीण होते. 6 / 8ब्रा चे कप खूप नाजूक असतात. यामध्ये जर पॅडेड किंवा लेस ब्रा असेल तर मशिनमध्ये धुतल्याने कापड फाटू शकते किंवा त्यावर रेघा पडतात. ज्यामुळे वापरता येत नाही. 7 / 8ब्रा मशीनमध्ये धुतल्यामुळे हुक खराब होतात. हुक इतर कपड्यांमध्ये अडकून तुटू शकतात. ज्यामुळे बाकीचे कपडे देखील खराब होऊ शकतात. 8 / 8ब्रा धुताना ती पाण्यात डिटर्जंट घालून धुवायला हवी. गरम पाणी, ब्लीच किंवा इस्त्रीचा वापर करु नका. यामुळे ब्रा लवकर खराब होते.