1 / 10लग्नसराईचा सिझन आत्ता सुरु झाला आहे. सध्याच्या (New 7 Dupatta Draping Styles for Lehenga) ट्रेंडनुसार, लग्नात मोठमोठाले, घेरदार घागरे सगळ्याचजणी मोठ्या हौसेने घालतात. परंतु घागरा किंवा लेहेंगा (7 Dupatta Draping Ideas For This Wedding Season) घातल्यावर त्यावर दुपट्टा कोणत्या पद्धतीने स्टाईल करावा असा प्रश्न पडतो. 2 / 10 घागरा किंवा लेहेंगा पायघोळ असतोच सोबतच दुप्पटा (How to wear lehenga dupatta in different styles) देखील लांबलचक असतो अशावेळी हा दुप्पटा पायांत न येता, तसेच अगदी परफेक्ट पद्धतीने लावला तर आपला लूक अधिकच जास्त उठून दिसतो. 3 / 10यासाठीच, यंदाच्या लग्नसराईत तुम्ही देखील घागरा किंवा लेहेंगा घालणार असाल तर, दुप्पटा कसा ड्रेप करावा याच्या १० वेगवेगळ्या पद्धती पाहूयात. 4 / 10घागरा किंवा लेहेंग्यावर आपण वेस्टर्न ड्रेप स्टाईलने दुपट्टा लावू शकता. यात दुपट्टा खांद्यावर अशा पद्धतीने पिनअप केला जातो की तो खाली लेहेंग्यावर तिरक्या आकारात अगदी परफेक्ट बसतो. 5 / 10यात आपण दोन्ही खांद्यावर दुपट्टा ड्रेप करु शकता किंवा दोन्ही खांद्यावर दोन वेगवेगळ्या रंगाचे दुपट्टा ड्रेप करून तुमचा लूक अधिकच हटके आणि आकर्षक करु शकता. 6 / 10महाराणी ड्रेप या पद्धतीमध्ये दुपट्टा अशा प्रकारे ड्रेप केला जातो की तुम्हाला महाराणी लूक मिळतो. यात एकाच खांद्यावर दुपट्टा ड्रेप करून महाराणी लूक दिला जातो. 7 / 10साडी ड्रेप पद्धतीत दुपट्टा असा स्टाईल केला जातो की, तुम्ही साडी नेसली आहे असे वाटते. साडी नेसल्यावर जसा पदर दिसतो त्याच प्रकारे दुपट्ट्याची ड्रेपिंग केली जाते म्हणून या प्रकाराला 'साडी ड्रेपिंग' असे म्हटले जाते. 8 / 10सध्या केप ड्रेप ही दुपट्टा ड्रेपिंगची पद्धत फार ट्रेंडमध्ये आहे. यात दुपट्टा पाठीमागच्या बाजूने ड्रेप करून दोन्ही खांद्यांवरून पुढे काढला जातो. एखाद जॅकेट घालतो त्याप्रमाणे दुपट्टा ड्रेप केला जातो. 9 / 10वॉटरफॉल ड्रेप ही पॅटर्न कोसळत्या धबधब्या प्रमाणेच असते म्हणून याला 'वॉटरफॉल ड्रेप' असे म्हणतात. यात एका खांद्यावर दुपट्टा लावून तो घागऱ्यावर अशा पद्धतीने स्टाईल केला जातो की तुमचा लूक अधिकच सुंदर दिसतो. तसेच या पद्धतीमुळे दुपट्टा पायांत देखील येत नाही. 10 / 10 केप विथ बेल्ट या पद्धतीत तुम्ही बेल्टच्या मदतीने दुप्पट स्टाईल करु शकता. एका खांद्यावरून दुपट्टा घेऊन दुसऱ्या खांद्यावरून सोडून तुम्ही कमरेच्या बेल्टमध्ये अडकवून स्टाईल करु शकता.