नव्या नवरीसाठी ब्लाऊजचे ५ खास डिझाइन्स! साध्या साडीवरही दिसतील शोभून, सुंदर आणि आकर्षित
Updated:April 13, 2025 18:05 IST2025-04-13T18:00:00+5:302025-04-13T18:05:01+5:30
Bridal blouse designs: Wedding blouse designs: Fancy blouse neck designs: Latest blouse designs for brides: कोणत्याही फंक्शनमध्ये साधी साडी नेसणार असू तर ब्लाऊजच्या गळ्यासाठी या डिझाइन्स शोभून दिसतील.

सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. अशातच नव्या नवरीसाठी सगळ्यात अवघड काम असते ते ब्लाऊजचे डिझाइन्स सिलेक्ट करणे. सुंदर आणि फॅन्सी दिसण्यासाठी आपण नवीन पद्धतीचे डिझाइन्स शोधत असतो.
लग्नात आपण जास्त भरलेली साडी किंवा इतर कोणत्याही फंक्शनमध्ये साधी साडी नेसणार असू तर ब्लाऊजच्या गळ्यासाठी या डिझाइन्स शोभून दिसतील.
रॉयल वी नेकमध्ये जरी आणि रेशमी भरतकाम केले आहे. ज्यामुळे हे ब्लाऊज आपल्याला शाही लूक देते. व्ही नेक डिझाइन्स आपल्या खांद्यांना आणि नेकलाइनला हायलाइट करते.
मिरर वर्क असलेला डीप नेक ब्लाऊज आपण हळदी किंवा मेहंदी फंक्शनमध्ये घालू शकतो.
कॅप स्टाईल ब्लाऊज हे डिझाइन खूप ट्रेंडमध्ये आहे. हे फोटोशूटसाठी नवरीच्या लूकमध्ये अधिक भर घालते.
गोल्डन सिक्विन ब्लाऊज नव्या नवरीसाठी सुंदर डिझाइन आहहे. यामध्ये आपल्याला मोठा हार किंवा चौकर घालता येते. ज्यामुळे सौंदर्य खुलून दिसते.
फॅन्सी ब्लाऊज डिझाइन्समध्ये व्ही नेक, गोल्डन सिक्विन एम्ब्रॉयडरी सारखे डिझाइन्स आपल्याला अधिक खास बनवतात. हे ब्लाऊज आपल्या लूकला परिपूर्ण बनवतात.