ट्रम्पच्या डिनर पार्टीत नीता अंबानींच्या 'या' साडीची प्रचंड चर्चा, साडी विणायला लागले १९०० तास...
Updated:January 22, 2025 16:28 IST2025-01-22T15:05:09+5:302025-01-22T16:28:24+5:30

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर आयोजित डिनर पार्टीमध्ये नीता अंबानींनी नेसलेल्या साडीची खूपच चर्चा झाली होती..
नीता अंबानी यांनी नेसलेली ही साडी सेलिब्रिटी डिझायनर तरुण ताहिलियानी यांच्या कलेक्शनमधली असून ती जामावार (Jamawar) या प्रकारातली आहे.
जामावार हा शब्द पार्शियन भाषेतला असून त्याचा अर्थ फुलांनी सजवलेला कपडा असा होतो. नावावरूनच लक्षात येतं की या साडीवर कित्येक प्रकारची नाजूक फुलं आहेत.
जामावार ही विणकामाची कला मुळची काश्मिरची असून तिथूनच ती पारशी आणि मध्य आशियातल्या व्यापाऱ्यांकडे गेली. याच जामावार कलेचा अतिउत्तम नमूना म्हणजे नीता अंबानी यांनी नेसलेली जामावार साडी.
ही साडी विणून घेण्यासाठी काही उत्कृष्ट कारागिरांची निवड करण्यात आली होती. या कारागिरांनी १९०० तास म्हणजेच जवळपास ८० दिवस काम करून ही साडी तयार केली. काळ्या आणि पांढऱ्या रंगाचं सुंदर कॉम्बिनेशन असणाऱ्या या साडीवर सेक्विन वर्क करण्यात आलेलं होतं. तसेच तिचे सोनेरी रंगाचे काठ हेवीवर्क करून हायलाईट करण्यात आले होते.