By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 19:31 IST
1 / 13नीता अंबानी (Neeta Ambani) या जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबापैकी एक आहेत. त्या फक्त त्याच्या कार्य पद्धतीमुळेच नाही युनिक लूकमुळे कायम चर्चेत असतात. त्यांचा लूक कायम चर्चेत असतो. फॅशन आणि स्टाईलिंग टिप्ससाठी फॅशन आयकॉन नीता अंबानींचे लूक फॉलो करण्याचा प्रयत्न अनेकजण करतात. 2 / 13देशातील सगळ्यात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी, बिझनेसवुमन नीता अंबानी एक फॅशनिस्टासुद्धा आहेत. डिजानर साडी आणि लेहेंगे याशिवाय त्यांच्याकडे ज्वेलरीजचे ही एकापेक्षा एक कलेक्शन आहे.3 / 13खासकरून नीता अंबानींना डायमंड्सचे दागिने खूप आवडतात. अनेक कार्यक्रमांना उपस्थित दर्शवताना त्यांनी वेगवेगळे डायमंड नेकलेस कॅरी केले होते. तुम्हीसुद्धा त्यांचा हा लूक रिक्रिएट करू शकता किंवा आर्टिफिशियल डायमंड सेट्स बनवून घेऊ शकता. 4 / 13हिरव्या स्टोनचा डायमंड नेकलेस आणि त्यावर मॅचिंग इअररिंग्स त्यांनी लाल साडीवर कॅरी केल्या होत्या. यावेळी त्यांनी फ्लोरस बांगड्यांसह हिरव्या स्टोनची रिंग घातली होती. 5 / 13नीता अंबानी केवळ पारंपारिक पोशाखाच दिसत नाहीत तर काही वेळा आपल्या जबरदस्त पार्टी लुक्सने आश्चर्यचकित करतात. एका इव्हेंटमध्ये त्यांनी फुलांची नक्षी आणि सिक्वीन्सने सजलेला शिफॉन ड्रेस घातला होता. यासोबतच, अनोखे फ्लोरल डायमंड इअररिंग कॅरी केले होते. 6 / 13नीता अंबानी यांनी आकर्षक अॅक्सेसरीजसह सुशोभित केलेला पोशाख घातला होता. यावर त्यांनी झुमक्यांचे एअरींग्स घातले होते. 7 / 13नीता अंबानी यांनी पार्टी लूकसाठी हा सेट निवडला. लाल रंगाच्या गाऊनवर त्यांनी डायमंडचा नेकलेस कॅरी केला. 8 / 13निळ्या रंगाच्या हेवी बॉर्डर असलेल्या साडीवर नीता यांनी मोठे लहान लहान स्टोनचे कानातले आणि भरलेल्या गळ्याचा नेकलेस घातला होता. 9 / 13मोत्याचा नेकलेस आणि मोत्यांचा मोठा हार नीता यांनी ऑफ व्हाईट ड्रेसवर घातला होता. डायमंड नेकलेस आणि 5-स्टेप कानातले आणि मल्टी-टायर्ड मोत्यांचा हार होता.10 / 13राधिका मर्चंटच्या अरंगेत्रम कार्यक्रमासाठी, नीता यांनी केशरी सिल्कची साडी नेसली आणि हिऱ्यांच्या उत्कृष्ट दागिन्यांसह पारंपारीक लूक दिला.नीता यांनी मोत्यांच्या टायर्सने सजवलेला सोनोरी हार आणि एक मोठे लॉकेट, डायमंडच्या लांब साखळ्यांनी जोडलेले फुलांचे झुमके, हार्ट आकाराची मोठी अंगठी, हिऱ्याच्या बांगड्या निवडल्या.11 / 13केशरी रंगाच्या लेहेंगा चोलीमध्ये नीता एकदम राजेशाही थाटात दिसत होते. त्यांनी डायमंड कुंदन नेकपीस घातला होता आणि हातात ब्रेसलेट रिंग परिधान केली होती. 12 / 13(Image Credit -Social Media)13 / 13(Image Credit- Social Media)